पावसाळ्यातील रानभाज्या आरोग्यासाठी गुणकारी
By Admin | Published: June 28, 2017 12:17 PM2017-06-28T12:17:56+5:302017-06-28T12:17:56+5:30
जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात दरवर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या आढळून येतात. या भाज्या चवीला रुचकर असतातच शिवाय आरोग्यासाठी त्या पौष्टीक आणि औषधीसुद्धा असतात.
>ऑनलाइन लोकमत
जुन्नर, दि 1 - जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात दरवर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या आढळून येतात. या भाज्या चवीला रुचकर असतातच शिवाय आरोग्यासाठी त्या पौष्टीक आणि औषधीसुद्धा असतात.
जाणून घेऊया काही रानभाज्यांचे महत्त्व
टाकळा
- ही भाजी साधारणतः पावसाळ्यात अधिक उपलब्ध असते. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात
- टाकळाला सुगंध उग्र असला तरी कोवळ्या पानांची भाजी रुचकर लागते
- ही भाजी सर्व प्रकारच्या त्वचा रोगावर उत्तम औषध आहे, टाकळ्याच्या बिया वाटून त्याचा लेप त्वचेवरही लावला जातो.
- तसंच ही भाजी उष्ण असल्याने शरीरातील वात व कफ कमी होण्यास मदत होते