तिनं बदलली सौंदर्याची व्याख्या; मॉडेलच्या फोटोंची जगभरात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 07:47 PM2019-03-06T19:47:19+5:302019-03-06T19:47:52+5:30
सौंदर्याची व्याख्या प्रत्येक व्यक्तीगणिक बदलत जाते. कोण सुंदर आहे? कोण नाही?... याबाबत चर्चा करणाऱ्या व्यक्ती अजिबातच सुंदर असू शकत नाहीत. अनेकदा आपण थोरामोठ्यांकडून ऐकतो की, चेहऱ्याच्या सौंदर्यापैक्षा मनाचे सौंदर्य महत्त्वाचं ठरतं...
सौंदर्याची व्याख्या प्रत्येक व्यक्तीगणिक बदलत जाते. कोण सुंदर आहे? कोण नाही?... याबाबत चर्चा करणाऱ्या व्यक्ती अजिबातच सुंदर असू शकत नाहीत. अनेकदा आपण थोरामोठ्यांकडून ऐकतो की, चेहऱ्याच्या सौंदर्यापैक्षा मनाचे सौंदर्य महत्त्वाचं ठरतं... अशीच एक तरूणी आहे Iomikoe Johnson जी तुमच्या मनातील सौंदर्याच्या सर्व व्याख्याच बदलून जातील. आता तुम्ही म्हणाल अशी आहे कोण ही तरूणी? तर ही एक मॉडेल असून तिला पाहिल्यावर सर्वांच्या मॉडलिंगच्या संकल्पनाच बदलून जातात.
Iomikoe Johnson ही त्वचेच्या एका गंभीर आजाराने पीडित आहे. याला ल्यकोडर्मा असंही म्हटलं जातं.
खरं तर व्यावसायाने ही एक नवखी मॉडेल आणि रायटर आहे. तिने सांगितले की, तिचं तिच्या त्वचेवर फार प्रेम आहे. अख्य जगं ज्या गोष्टीला कमतरता म्हणून पाहत असतं तिच गोष्ट जेव्हा आपण आपली खासियत बनवतो त्यावेळी आपण इतरांपेक्षा वेगळं दिसतो.
आपल्या त्वचेच्या आजारावर बोलताना तिने सांगितले की, ती जेव्हा 25 वर्षांची होती तेव्हा एक छोटासा पांढरा डाग तिच्याहातावर आला होता. तेव्हा तिला वाटलं होतं की, कॅन्सरचं आहे.
तिने एक डिजिटल पुस्तकही लिहिलं आहे, त्याचं टायटल आहे The Spotted Girl. हे पुस्तक अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. तिने बोलताना सांगितलं की, ती कॅनेडियन मॉडेल Winnie Harlow पासून तिने प्रेरणा घेतली असून तिलाही Vitiligo आहे.
सध्या बॉडी शेमिंग आणि वर्णावरून संपूर्ण जगभरामध्ये चर्चा रंगल्या आहेत. त्यातून अनेकांनी अशी मतं मांडली आहेत की, जी व्यक्ती जशी आहे सर्वांनी तिला तसचं स्वीकारावं. कारण एखादी व्यक्ती जशी असते तशीच फार सुंदर असते. अशातच सौंदर्याच्या सर्व चौकटी मोडून Iomikoe सर्वांसमोर मोठ्या आत्मविश्वासाने उभी आहे.