या 9 आयडिया वाचा. घरातल्या भिंती सजवायला बाजारातल्या महागड्या पेंटिंग्जची गरज भासणार नाही!
By Admin | Published: June 1, 2017 07:08 PM2017-06-01T19:08:06+5:302017-06-01T19:08:06+5:30
पेंटिंग्ज, फ्रेम्स, फोटोज हे पर्याय टाळून आपल्या स्वत:च्या हातानं आणि कल्पकतेनंही भिंतींना सजवता येतं.
- सारिका पूरकर-गुजराथी
घराची मुख्य बैठक असू देत किंवा बेडरुम. ओक्या बोक्या भिंती बघितल्या की कसंसच होतं. आता भिंती सजवायचं म्हटलं तर पेंटिंग्ज, फ्रेम्स, फोटोज हेच पर्याय नेहमी हाताळले जातात. पण हे पर्याय टाळून आपल्या स्वत:च्या हातानं आणि कल्पकतेनंही भिंतींना सजवता येतं. अशा भिंती जेवढं सुखं आपल्याला देतात तितकंच पाहुण्या मंडळींनाही.
पोलका डॉट्स
यासाठी भिंतींवर तुम्हाला हव्या त्या ठिकाणी गोलाकार काढायचे आहेत. पोकळ नव्हे तर भरलेले. बाजारात विविध रंगात, आकर्षक डिझाईन्समध्ये वाशी टेप मिळतात. त्यापासून हे गोलाकार बनवा आणि भिंतीवर ठराविक अंतरावर लावून सुंदर फील मिळवा.
हार्ट आर्ट
बाजारात विविध रंगात पेण्ट चीप्स अर्थात रंगीत आर्ट पेपरचे तुकडे मिळतात. त्या पेपरमधून हार्टचे आकार पंच मशीनच्या सहाय्यानं कापून घ्या. रंगसंगती निवडताना शेडिंगवर भर द्या. म्हणजे एकाच रंगाचे नकोत. भरपूर आकार कापा. चार कॅनव्हासच्या तुकड्यांवर एका रांगेत हे आकार चिकटवा. त्यासाठी अॅडेसिव्ह फोम सर्कलचा वापर करा. म्हणजे थ्रीडी लूक येईल. चारही कॅनव्हासवर चिकटवून झाले की फ्रेम करा आणि चारही फ्रेम्स भिंतीवर अरेंज करा.
प्लोटिंग वॉल आर्ट
तुमच्याकडे शूज, सॅण्डल्स यांचे रिकामे खोके धुळ खात पडले असतील आणि ते तुम्ही फेकण्याच्या विचारात असाल तर तसे करु नका. त्याऐवजी हा फंडा ट्राय करा. खोक्यांची झाकणं घ्या. काही आकर्षक रंगसंगतीचे वापरात नसलेले कापडाचे तुकडे घ्या. मॉड पॉज ग्लूच्या सहाय्यानं कापड झाकणावर चिकटवून टाका. पुन्हा एक कोट द्या. असे विविध कापड लावून पाच- ते सहा झाकणं तयार करा आंओ भिंतीवर आर्ट पीस म्हणून रचना करा. झाकणाला आकर्षक कागद चिकटवून आतील बाजूवर तुमचे फोटोज देखील तुम्ही चिकटवू शकता आणि भिंतीवर ते लावू शकता. खोक्याच्या आतील आणि बाहेरील बाजूंवर ब्राईट रंग देऊन घ्या. आत आणि बाहेर वेगळे रंग हवे. चार-पाच खोके रंगवून झाले की पेंटर्स टेपच्या सहाय्यानं हे खोके भिंतीवर शेल्फ म्हणून चिकटवा. यात तुम्ही छोट्या सजावटीच्या वस्तू सहज ठेवू शकता.