५८ वर्षांच्या ‘आजोबा’ अंतराळावीराचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2016 02:09 PM2016-08-26T14:09:41+5:302016-08-26T19:39:41+5:30

जेफ विलियम्स नावाच्या या अंतराळवीराने सर्वाधिक काळ अवकाशात राहण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

The record of the 58-year-old 'grandfather' astronaut | ५८ वर्षांच्या ‘आजोबा’ अंतराळावीराचा विक्रम

५८ वर्षांच्या ‘आजोबा’ अंतराळावीराचा विक्रम

Next
म्हणजे फक्त एक आकडा असतो. अमेरिकेच्या एका ५८ वर्षांच्या अ‍ॅस्ट्रोनॉटने ते सिद्ध करून दाखवले. जेफ विलियम्स नावाच्या या अंतराळवीराने सर्वाधिक काळ अवकाशात राहण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने निवृत्त सहकारी स्कॉट केलीचा ५२० दिवसांचा विक्रम मोडला.

येत्या ६ सप्टेंबर रोजी जेव्हा जेफ पृथ्वीवर परत येईल तेव्हा त्याने आयुष्यातील ५३४ दिवस अवकाशात घालवलेले असतील. कोणत्याही अमेरिकन अंतराळवीरापेक्षा ते जास्त आहे. परंतु संपूर्ण जगातील अ‍ॅस्ट्रोनॉटस्चा विचार केला असता तो दुसऱ्या क्रमांकावर राहील. रशियाच्या गेनडी पॅडल्का ८७९ दिवसांसह पहिल्या स्थानावर आहे.

‘अ‍ॅटलांटिस’द्वारे २००० साली जेफने सर्वप्रथम अवकाशात भरारी घेतली होती. त्यानंतर तो २००६ साली पुन्हा इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर (आयएसएस) परतला. त्यावेळी आयएसएसमध्ये केवळ दोन मॉड्यूल आणि तीन क्रू सदस्यांची व्यवस्था होती. आज सहा अंतराळवीरांची क्षमता असलेले आयएसएस एका फुटबॉल मैदानाएवढे मोठे आहे.

पुढे २००९ आणि २०१० साली ‘एक्स्पिडिशन २१’मध्ये फ्लाईट इंजिनिअर तर ‘एक्सपिडिशन २२’मध्ये कमांडर म्हणून काम केले.  १९ आॅगस्ट रोजी करिअरमधील त्याने चौथा स्पेसवॉक  केला. १ सप्टेंबरला तो अखेरचा स्पेसवॉक करणार आहे. दोन मुलं आणि तीन नातवांचा आजोबा जेफ खरोखरंच प्रेरणादायी आहे.

Web Title: The record of the 58-year-old 'grandfather' astronaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.