​ फॉर्मेट न करता फोनमधून काढा व्हायरस!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2016 06:32 PM2016-12-06T18:32:04+5:302016-12-06T18:32:04+5:30

आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण बरेच नवनवीन अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करतो.

Remove virus from phone without formatting! | ​ फॉर्मेट न करता फोनमधून काढा व्हायरस!

​ फॉर्मेट न करता फोनमधून काढा व्हायरस!

Next
ल्या स्मार्टफोनमध्ये आपण बरेच नवनवीन अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करतो. मात्र बऱ्याचदा त्यासोबतच व्हायरसदेखील फोनमध्ये येतात. अ‍ॅन्टिव्हायरसच्या माध्यमातून आपण व्हायरस काढण्याचा प्रयत्नही करतो. मात्र व्हायरस जाता जात नाही आणि शेवटी आपल्याला फोनमधील फॅक्टरी रिसेट करावी लागते. पण यामुळे आपल्या फोनचा सर्व डाटा डिलीट होतो. आता मात्र एका ट्रिकच्या माध्यमातून आपल्या फोनला फॉर्मेट न करता व्हायरस काढता येईल आणि डाटादेखील जाणार नाही. 
सर्वप्रथम फोनचा सेफ मोड आॅन करा, यासाठी फोन आॅफ करा आणि त्यादरम्यान पॉवर बटन दाबून ठेवा. ज्यावेळी स्क्रीनवर नाव दिसेल त्यावेळी पॉवर बटन सोडून द्या. त्यानंतर लगेचच वॉल्यूम डाऊन बटन दाबा. डिव्हाइस रिस्टार्ट झाल्यानंतरच वॉल्यूम डाऊन बटन सोडा. त्यानंतर फोनमध्ये सेफ मोड दिसू लागेल.
यापद्धतीने सेफ मोड आॅन केल्यानंतर फोनच्या सेटिंगमध्ये जा, तिथे अ‍ॅप्सच्या डाऊनलोड आॅप्शनवर जा. तिथे डाऊनलोडेड एप्स लिस्टमध्ये तुम्ही डाउनलोड न केलेले एप्स दिसते का ते पाहा. जर असेल तर तो व्हायरस असू शकतो. या एप्सला अनइंस्टॉल करा. जर त्यानंतरही अ‍ॅप्स डिलीट होत नसेल तर सेटिंग सिक्योरिटीमध्ये जाऊन डिवाइड एडमिनिस्ट्रेशनमधून अ‍ॅप्स एक्टिवेट करा आणि परत पूर्वीसारखे अनइन्स्टॉल करा. तुमच्या फोनचा व्हायरस निघून जाईल.

Web Title: Remove virus from phone without formatting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.