‘ROSE DAY SPECIAL' : प्रेमात गुलाबाचे महत्त्व वेगळेच!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2017 06:05 AM2017-02-07T06:05:23+5:302017-02-07T11:38:24+5:30
जगभरात ७ फे ब्रुवारीला ‘रोज डे’ साजरा केला जातो आणि याच दिवसापासून व्हॅलेंटाइन डेचा आठवडा सुरु होतो. असे तर आपण आपल्या पार्टनरला प्रत्येकवेळी ‘गुलाबपुष्प’ देऊन शुभेच्छा देतो मात्र यावेळी आपण वेगळ्या पद्धतीने ‘रोज डे’ साजरा करुया.
शेवटी तो दिवस आलाच ज्या दिवसाची सर्व तरुणाईच्या ह्रदयांना ओढ असते. हो व्हॅलेंटाइन डेचा काउंटडाउन सुरू झाले आहे. प्रत्येक वर्षी जगभरात ७ फे ब्रुवारीला ‘रोज डे’ साजरा केला जातो आणि याच दिवसापासून व्हॅलेंटाइन डेचा आठवडा सुरु होतो. असे तर आपण आपल्या पार्टनरला प्रत्येकवेळी ‘गुलाबपुष्प’ देऊन शुभेच्छा देतो मात्र यावेळी आपण वेगळ्या पद्धतीने ‘रोज डे’ साजरा करुया.
योग्य गुलाबाची निवड करा
या दिवशी लाखो लोक आपल्या पार्टनरला गुलाब देतात. काही लोक आपले नाते कायम राहावे म्हणून, काही लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी तर काही लोक आपल्या पार्टनरला मनविण्यासाठी गुलाब देतात. मात्र आपणास माहित असेल की प्रत्येक गुलाबाचे एक वेगळे महत्त्व आहे.
रंगानुसार गुलाबाचे आहे महत्त्व
* लाल गुलाब
लाल गुलाब प्रेमाचे प्रतिक आहे आणि हे गुलाब एक दुसºयाला देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. फक्त एक गुलाब देऊन आयुष्यात साथ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिले जाते तर लाल गुलाबांचा गुच्छा आपले खरे प्रेम दर्शविण्यासाठी लोक एकमेकांना देतात.
* पिवळे गुलाब
पिवळे गुलाब मैत्रीचे प्रतिक आहे आणि लोक आपल्या मैत्रीच्या सुरुवातीस एकमेकांना पिवळे गुलाब देतात.
* पांढरे गुलाब
पांढरे गुलाब शांती आणि स्वच्छतेचे प्रतिक आहे. लोक आपल्या चुकांची माफी मागण्यासाठी एकमेकांना पांढरे गुलाब देतात.
* गुलाबी गुलाब
गुलाबी रंगाचे गुलाब उत्साहाचे प्रतिक आहे. आपले प्रिय व्यक्ति नेहमी आनंदी राहण्यासाठी गुलाबी गुलाब दिले जाते.
* गडद गुलाबी गुलाब
गडद गुलाबी रंगाचे गुलाब आनंद आणि प्रशंसाचे प्रतिक असते आणि याला आपल्या आवडत्या व्यक्तिची प्रशंसा करण्यासाठी दिले जाते.
* पर्पल गुलाब
पर्पल रंगाचे गुलाब पहिल्या नजरेचे प्रेम दर्शविते आणि हे व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या पे्रमीला प्रपोज करण्यासाठी दिले जाते.
‘रोज डे’च्या काही खास टिप्स
* प्रियकराला गुलाब देऊन करा दिवसाची सुरुवात
* आपल्या पार्टनरची आवड-निवड जाणा
* गुलाबांची बुके स्वत: सजवा
* गुलाबाबरोबरच ‘रोज डे’बाबत मॅसेज द्यायला विसरु नका
* सरप्राइज बुके घर पोहचवा