विवाहाच्या शाही थाटात आता रॉयल लूकचा ब्रोकेड घागरा भाव खाणार! असं आहे काय या घागर्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:52 PM2017-07-29T16:52:23+5:302017-07-29T17:07:37+5:30

घागरा चोलीचा ट्रेण्ड कधीच मागे पडलाय. सध्या ब्रोकेड घागरा पॅटर्न प्रचंड लोकप्रिय ठरतो आहे. शाही भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचा संगम असलेला हा ब्रोकेड घागरा पॅटर्न मस्ट ट्राय असाच आहे.

Royal Style Broked Ghagara replace ghagra choli fashion . What's new in this patern? | विवाहाच्या शाही थाटात आता रॉयल लूकचा ब्रोकेड घागरा भाव खाणार! असं आहे काय या घागर्यात?

विवाहाच्या शाही थाटात आता रॉयल लूकचा ब्रोकेड घागरा भाव खाणार! असं आहे काय या घागर्यात?

googlenewsNext
ठळक मुद्दे* ब्रोकेड हे कापड प्युअर सिल्कचाच एक प्रकार आहे. मात्र सोनेरी जरी तसेच इतर रंगांच्या धाग्यांचा मेळ साधून , त्यातून विविध डिझाईन्स बनवून विणलेलं हे कापड आहे.* ब्रोकेड घागरा हा केशरी, गडद गुलाबी, राणीकलर, जांभळा, निळा, लाल, मोरपंखी, सोनेरी , फिरोजी, या रंगात उठावदार दिसतो.* ब्रोकेड घागर्यावर सहसा सिल्कचं प्लेन ब्लाऊज उठून दिसतं.* ब्रोकेड घागर्यावर घालण्यासाठी डिझायनर गोंडे हा चांगला पर्याय आहे.



सारिका पूरकर-गुजराथी


घागरा-चोली, लेहंगा चोली, गुजरातचे बांधणीचे डिझाईन असलेले कॉटनचे घेरदार घागरे किंवा राजस्थानचे भरतकाम आणि आरसेकाम केलेले घागरे किंवा अलीकडचे डिझायनर घागरे, शिफॉन, जार्जेटचे जरदोसी, कुंदन,मोतीवर्क केलेले वेडिंग घागरे हे आॅप्शन तुम्ही ट्राय करणार असाल तर थोडं थांबा.. कारण घागरा चोलीचा हा ट्रेण्ड कधीच मागे पडलाय. कारण सध्या ब्रोकेड घागरा पॅटर्न प्रचंड लोकप्रिय ठरतो आहे. शाही भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचा संगम असलेला हा ब्रोकेड घागरा पॅटर्न मस्ट ट्राय असाच आहे.


 

भारतीय हातमागाची जादू
 

एरवी नेट, शिफॉन, जॉर्जेट या फेब्रिकमध्ये भरतकाम, कुंदन, मोतीकाम केलेले घागरेच सर्वत्र दिसत होते. आता मात्र, ब्रोकेड या बनारसमधील हातमाग विणकरांच्या हातांची कमाल असलेल्या कापडापासून बनवलेले घागरे खूप लोकप्रिय होत आहेत. ब्रोकेड हे कापड प्युअर सिल्कचाच एक प्रकार आहे. मात्र सोनेरी जरी तसेच इतर रंगांच्या धाग्यांचा मेळ साधून , त्यातून विविध डिझाईन्स बनवून विणलेलं हे कापड आहे. म्हणूनच ब्रोकेड कापड नेहमीच शाही लूक देतं. घागर्यासाठीही ब्रोकेडचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ब्रोकेड घागरा तर आता शाही विवाहसमारंभाची स्टाइल झालाय.

 

ब्राईट रंग अन डिझाइन्सची विविधता
 

ब्रोकेड घागरा हा केशरी, गडद गुलाबी, राणीकलर, जांभळा, निळा, लाल, मोरपंखी, सोनेरी , फिरोजी, या रंगात उठावदार दिसतो. जसे सिल्क, काठपदराच्या साड्या या गडद रंगात शोभून दिसतात तसेच ब्रोकेड घागरा देखील ब्राईट रंगात खुलून दिसतो. पैठणीप्रमाणेच ब्रोकेडमध्येही बुटी डिझाइन्स लोकिप्रय आहेत. यात विविध प्रकार उपलब्ध आहेत. निसर्गाकडून प्रेरित होऊनच या डिझाइन्स कापडावर विणल्या गेलेल्या आहेत. यात बदाम बुटी, आंबा बुटी, फुलदार बुटी, चांद ( चंद्र ) बुटी,कॉईन बुटी, पान बुटी , मोरनी बुटी या डिझाइन्स ब्रोकेड घागर्यातही खूप हिट आहेत. तसेच टिश्यू , कोरा सिल्क, किनख्वाब, मश्रू, ताशी, बाफ्ता या फेब्रिकवर बनवलेले बनारसी ब्रोकेड डिझाईन्स आणि हे कापड घागर्यासाठी वापरलं जातं.
 

सिल्कचे प्लेन ब्लाऊज

ब्रोकेड घागर्यावर सहसा सिल्कचं प्लेन ब्लाऊज उठून दिसतं. शक्यतो घागर्याच्याच रंगाचं किंवा कॉन्ट्रास्टही छान दिसतं. या प्लेन ब्लाऊजला डिझायनर लूक देण्यासाठी आकर्षक लेस, पॅच, लटकन लावलेले असतात. हे ब्लाऊज शॉर्ट, फुल, थ्री फोर्थ अशा स्लीव्हजचं तसेच कॉलर पॅटर्न,ड्रॉप, क्र ॉप टॉप या पॅटर्नमध्येही शोभून दिसतं.

 


 

प्लेन असू देत नाहीतर फ्लोरल

घागर्याच्या दुनियेतही अनेक नवनवीन बदल होत आहेत. प्लेन घागरा तसेच फ्लोरल घागरा हा देखील त्यातलाच एक प्रकार आहे. हे घागरे देखील सिल्क, आर्ट सिल्क या प्रकारात खूप छान दिसतात. प्लेन घागर्यावर फ्लोरल किंवा प्रिण्टेड ब्लाऊज आणि फ्लोरल घागर्यावर सिल्क, वेल्वेटचे प्लेन ब्लाऊज असं हे कॉम्बिनेशन युवतींमध्ये खूपच फेमस आहे.
 

गोंड्यांमुळे रिच लूक
 

एरवी घागरा किंवा डिझायनर साडी, लग्नसमारंभात नेसायच्या साडीवर कमरपट्टा, छल्ला या दागिन्यांनी शृंगार केला जात होता. आता कमरपट्टा किंवा छल्ल्याची जागा डिझायनर गोंड्यांनी घेतली आहे. ब्रोकेड घागर्यावर घालण्यासाठीचे हे गोंडे अत्यंत आकर्षक डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. जरीची लेस, रेशीम गुंडाळलेले मणी-मोती, क्रि स्टल्स, कुंदन, आरशांची सजावट असलेले हे गोंडे लांबसडक असतात. घागरा घातल्यावर कमरेच्या भागावर उजवीकडे ते खोचले जातात. दिसायलाही रिच आणि हटके लूक यामुळे मिळतो. सर्व प्रकारच्या घागर्यावर हे खुलून दिसतात हे आणखी विशेष.

Web Title: Royal Style Broked Ghagara replace ghagra choli fashion . What's new in this patern?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.