आॅफिसात ‘सलवार-कुर्ती’ने दिसा हटके !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2016 04:41 PM2016-12-27T16:41:12+5:302016-12-27T16:41:12+5:30
आॅफिसला जाताना आपला ड्रेसकोड योग्य असणे गरजेचे असते. कारण आपण कोणत्या प्रकारचा ड्रेस परिधान करुन आॅफिसात वावरता आहेत, यावर आपली वेगळी ओळख निर्माण होत असते. आजच्या सदरात आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत, ज्यामुळे इतरांपेक्षा हटके दिसाल.
Next
आ फिसला जाताना आपला ड्रेसकोड योग्य असणे गरजेचे असते. कारण आपण कोणत्या प्रकारचा ड्रेस परिधान करुन आॅफिसात वावरता आहेत, यावर आपली वेगळी ओळख निर्माण होत असते. आजच्या सदरात आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत, ज्यामुळे इतरांपेक्षा हटके दिसाल.
* भारतीय स्त्रियांसाठी बेस्ट आणि योग्य पेहराव असेल तर सलवार-कुर्ती होय. या आऊटफिटवर भारतीय स्त्रिया खूपच सुंदर दिसतात शिवाय त्यांच्या व्यक्तित्त्वाला नवा लूकही मिळतो. यासाठी मात्र उंची, वजन व रंग लक्षात ठेवणे गरजेचे आहे. शिवाय आपल्याला आकर्षणाचे केंद्र न बनता प्रोफेशनल बनायचे आहे, याकडेही लक्ष असू द्या.
*आपणास जर चुडीदारची आवड असेल तर कुर्तीची लांबी व कट या गोष्टींनाही महत्त्व द्या. लठ्ठ स्त्रियांना चुडीदार शोभत नाही. परंतु तरीही चुडीदार घालायचा असेल तर कुर्तीची लांबी छोटी नको. यासोबत तुम्ही चांगल्या फिटिंगचे ट्राऊजर किंवा चुडीदार सलवार किंवा सलवार घालू शकता.
* आॅफिसमध्ये प्रिंटेड कपडे अजिबात घालू नका. गळा व बाह्यांभोवती काहीप्रमाणात एम्ब्रॉयडरी असेल तर चालेल. कापड असा असायला हवा जो लवकर चुरगळणार नाही. आॅफिससाठी गुडघ्याच्या लांबीची कुर्ती चांगली वाटते. त्यापेक्षा कमी नाही.
* आपण ओढणी कशी घेतो यावरुन आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते. जर ओढणी शिफॉन, क्रेप किंवा जॉर्जेटची असेल तर त्याला पिन लावा. कॉटनची ओढणी गळ्याभोवती गोल करुन घेता येऊ शकते.
* स्कर्टमध्ये तुम्ही ग्लॅमरस व स्टायलिश दिसू शकता. परंतु स्कर्ट चांगल्या प्रकारे कॅरी करता यायला हवा. आॅफिसमध्ये चालत असेल तर तुम्ही कलमकारी स्कर्ट घालू शकता.
* एक प्रोफेशनल इमेज बनविण्यात रंगांचे महत्वाचे स्थान आहे. लाल रंग रागीट स्वभाव व्यक्त करतो. नेव्ही रंग विश्वासाचे प्रतिक आहे. हे रंग पॅन्ट, सूट, स्कर्ट आदींमध्ये छान दिसतात.