/>. एकट्या राहणाºया ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्प एज इंडिया या संस्थेने सेव्ह अव्हर सिनिअर हे अॅप सुरु केले आहे. हे अॅप अॅन्ड्राईड मोबाईलवर अपलोड करता येईल. ज्येष्ठ नागरिकांनाही हे अॅप अपलोड करता येऊ शकते. हेल्प एज ही संस्था ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करीत आहेत. मागील काही वर्षात ज्येष्ठांचा कुटुंबामध्ये होणारे छळ वाढले आहेत. पहिल्या टप्यात हे अॅप महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या शहरात सुरु केले जाईल. यावर हेल्पलाईनची सुविधाही असणार आहे. सध्या हे अॅप इंग्रजीतून असून, लवकरच ते मराठी भाषेतून सुरू करण्यात येणार आहे. यावरील लाल रंगाचे एसओएस बटण दाबवयाचे आहे. ज्येष्ठांच्या प्रश्नासाठी रकाने असून, त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. सध्या मार्के टमध्ये काय सुरु आहे, याचीही माहिती त्यामध्ये आहे. ज्येष्ठ नागरिक गरजेच्या वेळी या अॅपचा वापर करु शकतात. सरकारी किंवा खासगी क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सुविधेची माहिती यामध्ये असणार आहे. ज्येष्ठांसाठी हा एका चांगला पर्याय आहे.
Web Title: Save sometimes senior
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.