​या शाळेत आहे टाळ्या वाजविण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 04:04 PM2016-07-21T16:04:44+5:302016-07-21T21:34:44+5:30

आॅस्ट्रेलियातील सिडनी शहरात अशी एक शाळा आहे जिथे टाळ्या वाजविण्यार बंदी आहे.

This school is banned from playing clowns | ​या शाळेत आहे टाळ्या वाजविण्यास बंदी

​या शाळेत आहे टाळ्या वाजविण्यास बंदी

Next
ावे ते नवलच असे म्हणतात ना तशीच काहीशी घटना एका शाळेत घडली. आॅस्ट्रेलियातील सिडनी शहरात अशी एक शाळा आहे जिथे टाळ्या वाजविण्यार बंदी आहे. आश्चर्य वाटले ना?

अहो पण ते खरे आहे. ‘एलॅनोरा हाईटस् पब्लिक स्कूल’च्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना टाळ्या न वाजवण्याच्या सुचना केला आहे. त्याऐवजी शांततेत जयजयकार करून किंवा उत्साही चेहऱ्याद्वारे किंवा हवेत ठोस मारून आंनद व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.

या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शाळा प्रशासनाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार, जे विद्यार्थी गोंगाट-गोंधळ आणि मोठ्या आवाजासंबंधी अतिसंवदेनशील आहेत त्यांच्या काळजी आणि आदरापोटी आम्ही टाळ्या न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची ऊर्जादेखील वाया जात नाही आणि अस्वस्थतादेखील कमी होते.

अलिकडे आॅस्ट्रेलियामधील शाळा अशाच विचित्र नियमांमुळे चर्चेत येत आहेत. काही शाळांनी तर एकमेकांना मिठी मारण्यावर आणि ‘आॅस्ट्रेलिया डे’ साजरा करण्यावर बंदी घातली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एका मुलींच्या शाळेने  लिंगभेद न करण्याच्यादृष्टीने तेथील शिक्षकांना विद्यार्थीनींना गर्ल्स, लेडिज्, वुमेन असे न संबोधण्याचा नियम लागू केला आहे.

Web Title: This school is banned from playing clowns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.