​सुखी संसाराचे रहस्य अखेर उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2016 12:36 PM2016-08-09T12:36:02+5:302016-08-09T18:12:03+5:30

रात्री घेतलेली चांगली झोप जोडप्याच्या नात्यामध्ये नवा उत्साह भरून नकारात्मक भावनांचा प्रभाव लग्नावर पडू देत नाही.

The secret of a happy world finally unravels | ​सुखी संसाराचे रहस्य अखेर उलगडले

​सुखी संसाराचे रहस्य अखेर उलगडले

Next
साराचा गाडा ओढताना होणारी ओढताण आणि त्यातून येणाऱ्या समस्या, अडचणी, नैराश्य यासारख्या नकारात्मक बाबींचा नात्यावर पडणारा विपरित परिणाम जवळपास प्रत्येक विवाहित जोडप्याच्या वाट्याला येतो. मग अशी काही जादुची कांडी आहे का, ज्यामुळे संसार सुखी होईल? जादुची कांडी तर नाही पण रोज रात्री पुरेशी झोप घेतली तरी संसार सुखी होऊ शकतो.

बरोबरच वाचले तुम्ही. नव्या संशोधनानुसार रात्री घेतलेली चांगली झोप जोडप्याच्या नात्यामध्ये नवा उत्साह भरून नकारात्मक भावनांचा प्रभाव लग्नावर पडू देत नाही. जेव्हा पती-पत्नी दोघेही रात्री साखरझोप घेतात तेव्हा निदान पुढच्या दिवशी तरी ते त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल समाधानी असतात. ‘आपल्या अध्ययानाचे वैश्विक स्वरूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे’, असे ‘फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी’चे हीथर मॅरेंजस म्हणाले.

हे तर सर्वांनाच माहीत आहे की, पुरेशी झोप घेणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. नात्याच्या कुठल्याही टप्प्यावर किंवा कुठल्याही संस्कृतिमधील जोडपे असू देत, पुरेशी झोप झाली नाही तर त्यांच्या नात्यावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.

या अध्ययनात ६८ नवविवाहित दाम्पत्यांचा सात दिवसांच्या कार्यकाळासाठी अभ्यास करण्यात आला. या दरम्यान रोज किती तास झोपली याची नोंद ठेवून दुसºयादिवशी त्यांना दोन वेगळ्या संचातील प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या उत्तारांवरून वरील निष्कर्ष काढण्यात आले.

Web Title: The secret of a happy world finally unravels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.