ब्रेड एवढे जास्त आवडण्याचे रहस्य उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2016 04:46 PM2016-09-06T16:46:26+5:302016-09-06T22:16:26+5:30

ब्रेड किंवा पास्तामध्ये ‘स्टार्च’ ही स्वतंत्र चव असते आणि यामुळेच ते आपल्याला खायला एवढे आवडतात.

The secret of so much love has spread to bread | ब्रेड एवढे जास्त आवडण्याचे रहस्य उलगडले

ब्रेड एवढे जास्त आवडण्याचे रहस्य उलगडले

Next
ापाव असू द्या की पावभाजी, भारतीय असू देत की विदेशी लोक, सर्व जण ब्रेडयुक्त खाद्यपदार्थ अत्यंत चवीने खातात. असे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत होते आणि एक रंजक शोध त्यांना लागला. आतापर्यंत जगात केवळ पाच मूूळ चवी (गोड, आंबट, खारट, कडू आणि उमामी) असतात, असे मानले जायचे. परंतु शास्त्रज्ञांना वाटते की, या व्यतिरिक्त सहावी चवसुद्धा असते.

ओरेगान स्टेट युनिव्हर्सिटी येथील संशोधकांनी केलेल्या अध्ययनानुसार ब्रेड किंवा पास्तामध्ये ‘स्टार्च’ ही स्वतंत्र चव असते आणि यामुळेच ते आपल्याला खायला एवढे आवडतात. यापूर्वी असे मानले जात असे की, कार्बोहायड्रेट पदार्थांमध्ये असणाऱ्या गोडव्यामुळे ते आपल्याला आवडतात. परंतु या नव्या संशोधनात ‘स्टार्च’ गोडपणापासून वेगळी अशी स्वतंत्र चव असते असे दिसून आले.

यामध्ये संशोधकांनी सहभागी स्वयंसेवकांना विविध प्रकारचे कार्बोहायड्रेट मिश्रण चाखण्यास दिले. बहुतांश स्वयंसेवकांनी चॉकलेट किंवा तत्सम गोड मिश्रणांपेक्षा पीठाची चव असणारे जटील कार्बोदकयुक्त मिश्रणांना पसंती दर्शवली. जीभेवरून गोड चव नाहीशी करणारी संयुगे स्वयंसेवकांना दिल्यावरही त्यांनी ब्रेड आणि पास्तासारख्या पदार्थांना प्राधान्य दिले. याचा अर्थ की, गोडव्यामुळे नाही तर स्टार्चमुळे लोकांना हे पदार्थ आवडतात.

आपण जे काही पदार्थ खातो, त्यांची चव ही या पाच चवींच्या मिश्रणातूनच बनलेली असते. आता या नव्या संशोधनामुळे त्यामध्ये आणखी एक चव वाढवावी लागणार असे दिसतेय.

Web Title: The secret of so much love has spread to bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.