सिक्युरिटी स्मार्टफोन अ‍ॅप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2016 03:24 PM2016-06-28T15:24:57+5:302016-06-28T20:54:57+5:30

स्मार्टफोनला सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे

Security Smartphone Apps | सिक्युरिटी स्मार्टफोन अ‍ॅप्स

सिक्युरिटी स्मार्टफोन अ‍ॅप्स

Next

/>--------------------------------------
. थोडेही त्याकडे आपण दुर्लक्ष केले तर मोठे नुकसान होते. याकरिता आपल्या फोनमध्ये सेक्युरीटी अ‍ॅप्स असेल तर वायरसपासून धोका होऊ शकत नाही. स्मार्टफोन हळू चालणे, वेळोवेळी हँग होणे हे सुद्धा व्हायरसमुळे होऊ शकते. याकरिता काही टॉपचे  सिक्युरिटी अ‍ॅप्स असून, ते व्हायरन्सला रिमूव कण्याचे काम करतात. त्याची ही माहिती.
सीएम सेक्युरिटी अ‍ॅप्स : हा अ‍ॅप अ‍ॅन्टी व्हायनस प्रोटेक्शन व अ‍ॅप लॉक अशा दोन भागामध्ये असतो. एन्टी व्हायरन्स प्रोटेक्शनमध्ये हा अ‍ॅप नवीन अ‍ॅपला स्कॅन करण्याबरोबरच वेबसाईट फाईलही स्कॅन करतो. दुसºया अ‍ॅप्सच्या तुलनेत हा अ‍ॅप फास्ट असल्याचा डेवलपर्सचा दावा आहे.
अव्हास्ट मोबाईल सिक्युरिटी अ‍ॅप्स : हा अ‍ॅप खूप अ‍ॅड्राईड सेक्युरिटीमध्ये खूप प्रसिद्ध असून, त्याला कॉम्प्युटर व्हर्जन सुद्धा आहे. यामध्ये व्हायरस व मालवेयरला स्कॅन करण्याबरोबरच व्हायरस रिमूवल टूल सुद्धा आहे.  तसेच अ‍ॅप परमीशन मॅनेजमेंट टूल, अ‍ॅप लॉकिंग, कॉल ब्लॉकर फिचर्सही उपलब्ध आहेत.
नोरूट फायरवाल : हा अ‍ॅप डाटा प्रोटेक्ट करण्याबरोबरच फोनला व्हायरसपासून वाचवितो. या अ‍ॅपची रेटिंग 4.4 इतकी आहे.
कासपरस्काय इंटरनेट सेक्युरिटी अ‍ॅप : या अ‍ॅपमध्ये अंटी फिशिंग हे उत्तम फिचर आहे. वेब ब्राउजर युज केल्यानंतर रियल टाइम फिशिंग प्रोटेक्शन देते. तसेच टेक्स मॅसेज, ईमेल्सची सस्पिशियस लिंक ला स्कॅन करते.
 अफवॉल : हे स्मार्टफोन मधील एक पॉवरफुल असे अ‍ॅप आहे. यामध्ये अ‍ॅप प्रोटेक्शनसाठी पॅटर्न सुद्धा उपलब्ध आहे.
मालवेअरबायटस अंटी-मालवेअर : हे अ‍ॅप फोनमधील मालवेअर, इन्फेक्टेड अ‍ॅप, अनआॅथराइज्ड सर्विलेंस पासून वाचविते. मालवेअरला ते शोधून डिलीट करते. लोके शन ट्रेकिंग अ‍ॅपला ते मॉनीटरींग करते. तसेच  मेलिसिअल कोड व अनवान्टेड प्रोग्रामलाही स्कॅन करते.

Web Title: Security Smartphone Apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.