‘सेल्फी’ पाहत बसल्याने कमी होतो आत्मसन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2016 11:31 AM2016-10-25T11:31:17+5:302016-10-25T11:32:01+5:30

सोशल मीडियावर सेल्फी बघण्यात ज्या लोकांचा अधिक वेळ जातो, त्या लोकांचा आत्मसन्मान व आयुष्याबद्दलचे समाधान कमी होते.

Self-esteem decreases by looking at 'Selfie' | ‘सेल्फी’ पाहत बसल्याने कमी होतो आत्मसन्मान

‘सेल्फी’ पाहत बसल्याने कमी होतो आत्मसन्मान

Next
ेल्फी क्रेझ’ने आता सर्व मर्यादा तोडलेल्या आहेत. सेल्फीमुळे मृत्यूचा धोका तर असतोच; पण त्याबरोबरच आपल्या मानसिक आरोग्यावरसुद्धा परिणाम होतो. तुम्हाला जर फेसबुकवर तासनतास स्वत:चे किंवा मित्रांचे सेल्फी पाहण्याची सवय असेल तर ताबोडतोब ही सवय थांबवण्याची गरज आहे.

सोशल मीडियावर अशा प्रकारे सेल्फी बघण्यात ज्या लोकांचा अधिक वेळ जातो, त्या लोकांचा आत्मसन्मान व आयुष्याबद्दलचे समाधान कमी होते, असे संशोधक सांगताहेत. पेन्सिलव्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीतील रुक्सो वँग यांनी हे अध्ययन केले आहे.

आतापर्यंत सोशल मीडियावर पोस्ट आणि लाईक करण्यामागील प्रेरणेविषयी खूप संशोधन झाले आहे. परंतु आम्ही सोशल मीडियावर केवळ पाहणाच्या वृत्तीचा कसा परिणाम होतो याविषयी अध्ययन केले. म्हणजे केवळ फोटो पाहिल्याने व्यक्तीच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्याचा आमचा हेतू होता, असे रुक्सो विंग म्हणाले.

Selfie Facebook

आॅनलाईन सर्व्हेद्वारे जमा करण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांना आढळून आले की, जेवेढा जास्त वेळ व्यक्ती सोशल मीडियावर, असे फोटो पाहते तेवढा तिचा आत्मसन्मान व समाधान कमी होते. त्यामुळे अशा वागण्याला जरा आळा घातलेलाच बरा, नाही का!

Web Title: Self-esteem decreases by looking at 'Selfie'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.