SELFIE PROJECT: तो काढतोय ३० वर्षांपासून रोज ‘सेल्फी’! वाचा त्याची अद्भूत कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 10:52 AM2017-02-23T10:52:15+5:302017-02-23T16:22:15+5:30
‘सेल्फी’ क्रेझ जरी मागच्या सात-आठ वर्षांपासून आलेली असलेली तरी बॉस्टन शहरात एक अवलिया राहतोय तो मागच्या तीस वर्षांपासून रोज सेल्फी काढतोय. होय, ‘सेल्फी’ शब्द अस्तित्वात आणि प्रचलित होण्याच्या फार पूर्वीपासून कार्ल बेडेन हे बॉस्टन कॉलेजमधील प्रोफेसर दैनंदिन स्वत:चा एक फोटो घेत आहेत.
Next
आ पासून ठीक तीस वर्षांआधी म्हणजेच २३ फेब्रुवारी, १९८७ रोजी बेडेन यांनी ‘एव्हरी डे’ नावाने हा अनोखा प्रोजेक्ट सुरू केला होता. त्यांच्या या कामगीरीमुळे त्यांना ‘सेल्फीचा जनक’ म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. अमेरिकेतील मॅसेच्युएटस् येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय बेडेन यांना आज लोक जे सेल्फी म्हणून फोटो काढतात ते मुळीच आवडत नाही.
ते म्हणतात, मी जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू केला होता तेव्हा मला वाटले नव्हते की, एक दिवस त्याला ‘सेल्फी’ असे गोंडस नाव मिळेल आणि त्याचा मी जनक असेल. आजच्या तरुणांना सेल्फीचे प्रचंड वेड आहे. परंतु सोशल मीडियावर विनाकारण सेल्फी शेअर करणे मला आवडत नाही. पण हेदेखील तेवढेच खरे आहे की, सेल्फीची क्रेझ आली नसती तर मला आजएवढी प्रसिद्धी मिळाली नसती.
बॉस्टनमध्ये दोन वेळा बेडेन यांच्या सल्फींचे छायाचित्र प्रदर्शन भरवणारे हॉवर्ड येझरस्क सांगतात की, ‘माणसाला कोणत्या कोणत्या स्वरुपात स्वत:ला अमर ठेवायचे असते. शक्य असेल त्या माध्यमातून आपली ओळख कायम राखण्यासाठी त्याची धडपड असते. अशाच प्रकारच्या अनेक मानवीय वृत्तींना या प्रोजेक्टद्वारे स्पर्श करण्यात आला आहे.
‘एव्हरी प्रोजेक्ट’च्या दशकपूर्तीच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शन भरवणारे राबर्ट मन म्हणतात की, बेडेन यांनी सुरू केलेला हा प्रोजेक्ट केवळ वैयक्तिक नसून त्यामध्ये एक प्रकारची वैश्विकतादेखील आहे. आपण सर्व जण त्याच्याशी स्वत:ला जोडू शकतो. व्यक्तीचे वाढते वय अशा कलात्मकपद्धतीने कॅमेऱ्यात कैद झालेले पाहणे म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे.
►ALSO READ: ‘सेल्फी’ पाहत बसल्याने कमी होतो आत्मसन्मान