​SEXUAL SURVEY : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला वाढली ‘कंडोम’ची विक्री !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2017 08:02 AM2017-02-14T08:02:45+5:302017-02-14T13:33:14+5:30

एका सर्वेक्षणात या दिवशी कंडोमच्या विक्रीत सुमारे २५ टक्के वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही महाविद्यालय आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक विक्री होत असते.

SEXUAL SURVEY: 'Valentine's Day' sales of condoms! | ​SEXUAL SURVEY : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला वाढली ‘कंडोम’ची विक्री !

​SEXUAL SURVEY : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला वाढली ‘कंडोम’ची विक्री !

googlenewsNext
्हॅलेंटाईन्स डे’ला मोठ्या शहरांमध्ये ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट, रोज फ्लॉवर्स आदींचे दुकाने सजली आहेत. इंटरनेटवर ई-शॉपिंग वेबसाइट्सवरही तमाम आॅफर्स सुरू आहेत आणि खरेदीसाठी तरुण-तरुणींची संख्याही वाढत आहे. मात्र यात सर्वात चिंताजनक बाब असेल तर ती म्हणजे कं डोमची विक्री. एका सर्वेक्षणात या दिवशी कंडोमच्या विक्रीत सुमारे २५ टक्के वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही महाविद्यालय आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक विक्री होत असते. व्हॅलेंटाईन डे आला की कंडोमची विक्री देशातच नव्हे तर संपूर्ण जगात वाढते आणि याचे मुख्यत: दोन कारणे आहेत. पश्चिमी देशात कं डोमची विक्री वाढण्याचे कारण म्हणजे १४ ते २० फ्रे ब्रुवारी दरम्यान साजरा होणारा कंडोम वीक. तसेच भारतात विक्री वाढण्याचे कारण आहे पश्चिमी संस्कृतीचे अंधानुकरण. 
हे अनुकरण एक वेडेपणा असून तो आपल्या संस्कृ तीला मोठा फटका आहे. व्हॅलेंटाईन डेचे भूत आपल्या भारतीय तरुणाईवर एवढे वरचढ झाले आहे की, ते सर्व मर्यादा पार करीत आहेत. त्यामुळेच भारतात दरवर्षी या काळात कंडोमची विक्रीचे प्रमाण वाढतच आहे. 

Also Read : जास्त सेक्स केल्याने वाढते स्मरणशक्ती !

Web Title: SEXUAL SURVEY: 'Valentine's Day' sales of condoms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.