​SHOCKING : ‘ब्रेक-अप’ होण्याची आहेत ही १० कारणे !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2017 10:05 AM2017-02-18T10:05:54+5:302017-02-18T15:35:54+5:30

नाते कुठलेही असो त्या नात्याचा शेवट हा प्रत्येकासाठी त्रासदायकच असतो. कंटाळवाणे व निरस वाटू लागले की नात्यात ब्रेक-अप होतो.

Shocking: 10 reasons to have 'break-up'! | ​SHOCKING : ‘ब्रेक-अप’ होण्याची आहेत ही १० कारणे !

​SHOCKING : ‘ब्रेक-अप’ होण्याची आहेत ही १० कारणे !

Next
ong>-Ravindra More

नाते कुठलेही असो त्या नात्याचा शेवट हा प्रत्येकासाठी त्रासदायकच असतो. कंटाळवाणे व निरस वाटू लागले की नात्यात ब्रेक-अप होतो. याशिवाय अजूनही बरीच कारणे आहेत ज्यामुळे गोड आणि चांगल्या नात्यात दुरावा निर्माण होतो. मग काय आहेत ती कारणे ज्यामुळे आपण वेगळे होतो.

संवादाचा अभाव-
एखादे नाते जर सुदृढ असेल तर त्या नात्यात संवाद चांगला आहे हे समजावे, मात्र संवादाचा अभाव असल्यास त्या नात्यात दुरावा निर्माण व्हायला लागतो. काही तज्ज्ञांच्या मते, पार्टनर कामामुळे अथवा मित्रमैत्रिणींमुळे दूर राहू लागल्यास व दोघांमध्ये सुसंवाद नसल्यास नाते तुटण्यास वेळ लागत नाही.

खोटे बोलणे-
पार्टनरचा विश्वास कमी होण्याचे कारण म्हणजे खोटे बोलणे. वारंवार खोटे बोलल्याने आपल्या पार्टनरच्या मनात आपल्या बद्दल आदरही कमी होतो. जेव्हा पार्टनर कामाच्या वेळेबाबत, मेसेजेस, फोन कॉल्स बाबत तुमच्यासोबत खोटे बोलू लागतो तेव्हा त्याच्या तुमच्या नात्यातील गोडवा कमी झाला आहे असे ओळखा. 

सतत भांडणे-
दोघांमध्ये जर सतत भांडत किंवा वादविवाद होत असतील तर समजावे की आपल्या नात्यातील गोडवा कमी झाला आहे. असेच जर नेहमी होत राहिले तर नाते लवकर तुटण्याची दाट शक्यता असते.

आदर कमी होणे-
भावनिक दृष्ट्या मनाने वेगळे होण्याचे कारण म्हणजे एकमेकांबाबत आदर कमी होणे. आदर नसल्याने एकमेकांवर सहज संशय घेतला जातो त्यामुळे नात्यात दरी निर्माण होते. 

खूप बंधने लादणे-
नाते सजग असायला हवे. पण बºयाचदा अति बंधने लादली जातात, त्यामुळे त्या नात्याचा कंटाळा येतो. जेव्हा जोडीदार तुमच्या बाबत ओव्हर पजेसिव्ह असतो अथवा तुम्हाला सतत बंधनात ठेवतो तेव्हा ते तुमच्या ब्रेक-अपचे एक लक्षण असू शकते.

स्वार्थी विचार करणे-
आपल्या पार्टनरची काळजी घेतली किंवा त्याचा विचार केल्यास ते नाते अधिक सुदृृढ होते. मात्र जेव्हा तुम्ही फक्त स्वत:चाच विचार करता तेव्हा दुसºयाला तुमच्यापासून दूर जावे असे वाटू लागते.

प्रेमासाठी वेळ न देणे-
शारीरिक जवळीक असल्यामुळे नाते टिकून राहते यासाठी जोडप्यांनी काही काळ जाणिवपूर्वक एकत्र घालवणे आवश्यक आहे. शारीरिक जवळीक नसणे हे देखील नाते तुटण्यामागचे एक कारण असू शकते. 

फसवणे-
एकमेकांना जर तुम्ही वारंवार फसवत असाल तर ते नाते लवकर संपू शकते. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला फसवता तेव्हा तुम्हाला नाते टिकवायचे नाही असा संकेत मिळतो.

छळ करणे-
शारीरिक अथवा सेक्शुअल छळ केल्यानेही नाते संपुष्टात येऊ शकते. तर आपला पार्टनर जर आपल्याशी असे वागत असेल तर समजावे की त्यांच्यापासून दूर जाण्याची वेळ आली आहे. 

गरज नसणे-
तज्ज्ञांच्या मते, दोघांनाही एकमेकांची गरज असावी. जेव्हा जोडीदारांना एकमेंकाची गरज नसल्यासारखे वाटू लागले, तेव्हा तुमचे नाते लवकरच तुटण्याची शक्यता आहे हे समजावे.  

Web Title: Shocking: 10 reasons to have 'break-up'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.