आपल्या व्यवसायानुसारच हवेत शूज !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 06:12 PM2017-01-01T18:12:03+5:302017-01-01T18:12:16+5:30
नोकरी किंवा व्यवसाय करीत असताना त्याठिकाणी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडावी असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी पेहरावासोबतच योग्य शूज असणे गरजेचे असते.
नोकरी किंवा व्यवसाय करीत असताना त्याठिकाणी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडावी असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी पेहरावासोबतच योग्य शूज असणे गरजेचे असते. तज्ज्ञांच्या मते वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे शूज घालायला आवडतात. जाणून घेऊया की वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिंसाठी कोणत्या प्रकारचे शूज शोभून दिसतील.
* संपादक -
आपण जर संपादक असाल तर आपल्यासाठी प्लेन कॅज्युअल लोफर्स हा उत्तम पर्याय आहे. कधीही घालता येणारे, कम्फर्टेबल तरीही स्टायलिश दिसणारे हे शूज कोणत्याही कपड्यांवर शोभून दिसतात.
* डान्सर -
डान्सर्सना सिंगल बे्रस्टेड व्हाईट टक्सिडोसोबत घालायला क्लासिक रुट व स्ट्राँग मॉडर्न कट असलेले डबल माँक शूज घालायला उत्तम आहेत. बॅले ओपनिंग दरम्यान घालायला हे खास आहेत.
* कला व्यवसायिक -
कला क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी एलिगंट, सोफॅस्टिकेटेड व आरामदायी असे हे शूज उत्तम आहेत. शिवाय लेस असलेले कॅज्युअल लोफर्स हे व्यवसायाने कलात्मक गोष्टींची विक्री करणाºयांसाठी योग्य आहेत.
* शेफ -
शेफ असाल तर नक्कीच व्यस्त असाल. शेफच्या व्यस्त दिवसात त्याला साथ देण्यासाठी एक्सेंट्रीक गॅसेट शूज चांगला पर्याय आहे. लेस नसलेल्या प्रकारात मोडणारे हे शूज आपल्या लेदर लाईनमुळे सॉफिस्टिकेटेड दिसतात.
* गिटारिस्ट -
प्रतिभावंत गिटारिस्ट व कंपोजरला अधिक सोईस्कर व स्टाईलसाठी कोणत्याही औपचारिक किंवा अनौपचारिक प्रसंगी घालता येतील असे रिच डर्बी स्टाईलचे शूज चांगला पर्याय ठरतील.
* बाईकर -
स्टाईलशी तडजोड न करता आपला कम्फर्ट सांभाळू शकणारे असे जोधपूर बूट मॉडर्न फिरस्त्या लोकांसाठी आहेत. हे घालायला आणि काढायला फार सोईस्कर आहेत. हे बूट प्रसंगानुरुप कसेही घालता येतात.