SHOCKING : ‘ट्राय’च्या आदेशाने जिओची सरप्राइज आॅफर मागे !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2017 06:24 AM2017-04-07T06:24:13+5:302017-04-07T11:54:13+5:30
आदेशाची अंमलबजावणी करत रिलायन्स जिओने ही आॅफर मागे घेतली आहे.
Next
ज ओ प्राइम सदस्यत्वासाठी आधी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती नंतर आणखी १५ दिवसांसाठी वाढवण्यात आली होती. मात्र ही बाब ट्रायला खटकली असून जिओ प्राइम सदस्य होण्यासाठी दिलेली ही मुदतवाढ आणि समर सरप्राइज आॅफर मागे घ्यावी असे स्पष्ट आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हणजेच ट्रायने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करत रिलायन्स जिओने ही आॅफर मागे घेतली आहे. ज्या ग्राहकांनी या सेवेसाठी नोंदणी केलेली आहे त्यांच्या सदस्यत्वाला मात्र कोणताही धोका नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
ट्रायच्या आदेशाची अंमलबजावणी करत जिओतर्फे लगेचच ही आॅफर बंद करण्यात आली आहे. दरम्यान, समर सरप्राइज आॅफरसाठी ज्यांनी अर्ज भरले आहेत त्या ग्राहकांना ३ महिने मोफत सेवा दिली जाईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.