हे वाचून आपल्या केसांसाठी हेअर ड्रायर वापरावा का? याचा विचार तुम्ही नक्की कराल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 07:13 PM2017-07-19T19:13:53+5:302017-07-19T19:13:53+5:30

सारखे सारखे केस धुण्यानं केसांची जी हानी होते त्याच्या दसपट हानी ही हेअर ड्रायरने केस सुकवल्यामुळे होते.

Should you wear hairdryer for this hair? You will probably think of this! | हे वाचून आपल्या केसांसाठी हेअर ड्रायर वापरावा का? याचा विचार तुम्ही नक्की कराल!

हे वाचून आपल्या केसांसाठी हेअर ड्रायर वापरावा का? याचा विचार तुम्ही नक्की कराल!

Next



- माधुरी पेठकर


सुंदर दिसणं हे काही फक्त आता चेहरा आणि कातडीचा रंग यावरच अवलंबून राहिलेलं नाही. पायाच्या नखांपासून डोक्यावरच्या केसांपर्यंत अनेक प्रयोग केले जातात. कारण एकच ते म्हणजे फॅशनेबल दिसायचं. पण या प्रयोगामुळे कधीकधी फायदा होण्यापेक्षा नुकसानही होतं. पण हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्वचेप्रमाणेच केसांवरही नाना प्रयोग केले जातात. स्टाइलच्या नावाखाली केसांवर असे उद्योग केले जातात की त्यामुळे केसांमधलं मूळ सौंदर्यच हरवून जातं.
केस सरळ असले की त्याला कुरळे करायचे असतात आणि कुरळे असले की स्ट्रेट करायचे असतात. केस सारखे धुवायचे असतात आणि घाई इतकी की सेकंदा मीनिटात वाळवायचेही असतात. मग काय या प्रत्येक गोष्टीसाठी उपकरणांचा आधार घेवून केसांशी अक्षरश: खेळलं जातं.

 

हा निष्कर्ष काढताना अभ्यासकांनी त्यामागचं कारण संगितलं आहे. हेअर ड्रायरमधली तसेच हेअर आर्यनमधली हवा अतिशय उष्ण असते. त्याचा परिणाम केसातील पाण्यावर होतो. नखाच्या वरती त्वचेचा जसा पातळ पापुद्रा असतो तसाचा पापुद्रा हा केसांवरही असतो. या पापुद्रामध्ये केसांना मॉयश्चर पुरवणारं पाणी असतं. हेअर ड्रायरमधील गरम हवेनं या पाण्यात बुडबुडे निर्माण होतात. त्याचा परिणाम म्हणजे केसांवर ताण येतो आणि केस तुटतात. केस खराब होतात. केसातलं मॉयश्चर संपून केस कोरडे होतात. केसांना फाटे फुटतात.
सारखा हेअर ड्रायर वापरल्यानंच नाही तर एकदा दोनदा हेअर ड्रायर वापरल्यानंही केसांच तेच नुकसान होतं. केसांना नैसर्गिकरित्या कोरडं करून हेअर ड्रायर टाळणं हा केस सुंदर ठेवण्याचा आणि करण्याचा उत्तम उपाय आहे.

Web Title: Should you wear hairdryer for this hair? You will probably think of this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.