शू

By Admin | Published: April 6, 2017 09:13 PM2017-04-06T21:13:26+5:302017-04-06T21:13:26+5:30

फॅशन रॉक चप्पल, सॅण्डल, बूट यांच्यासोबतच शू रॅकमध्ये हल्ली फ्लिपफ्लॉप, स्निकर्स, लोफर्स, फ्लोटर्स ही मंडळीही विराजमान असतात

Shu | शू

शू

googlenewsNext

शू फॅशन रॉक चप्पल, सॅण्डल, बूट यांच्यासोबतच शू रॅकमध्ये हल्ली फ्लिपफ्लॉप, स्निकर्स, लोफर्स, फ्लोटर्स ही मंडळीही विराजमान असतात. त्यामुळे आपण कशासाठी बाहेर पडतोय हे बघून पायात काय घालावं हे ठरवावं लागतय. प्रसंगानुसार चपला घालण्याची फॅशन सध्या इन आहे. पायाचीच तर वहाण मग त्यात स्टाइलचं काय एवढं? हे असं वाटण्याचे दिवस केव्हाच मागे पडले. पूर्वी चपला बुटांचा एक एक जोड असला की तो वर्षभर चालायचा. पण आता एक दोन जोडांनी भागेनासं झालं आहे. त्यात पायातल्या वाहाणेचे असंख्य प्रकार आकर्षक स्वरूपात आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकार आपल्याकडेही हवा म्हणून चप्पल प्रेमी वरचेवर ‘शू शॉपिंग’करत राहतात. आता चपला बुटांचे एवढे प्रकार झालेत यामागचं कारण म्हणजे फॅशन. कपड्यांप्रमाणे चपल बुटांचीही फॅशन दिवसा आणि महिन्यागणिक बदलते आहेत. कोणत्या प्रसंगी कोणती वाहाण बरी दिसेल याचा विचार हल्ली खूप जास्त होत असल्यामुळेच पायातल्या वहाणेचं हे फॅशनेबल जग झपाट्यानं विस्तारतय. आणि याचाच परिणाम शू मार्केटवर झाला आहे. बूट, चप्पल, स्लीपर्स यापलिकडे जाऊन हल्ली बाजारात अनेक प्रकार आले आहेत आणि विशेष म्हणजे ते सगळेच प्रकार फॅशन म्हणून इन आहेत. त्यातही विशेषत: फ्लिप-फ्लॉप, स्निकर्स, लोफर्स आणि फ्लोटर्स हे प्रकार अत्यंत आवडीनं वापरले जातात. फ्लिप-फ्लॉप - समुद्रकिनाऱ्यावर जाताना किंवा अगदी सहजच फिरायला निघताना या स्लिपर्स सदृश्य दिसणाऱ्या फ्लिप-फ्लॉप्स अगदी आकर्षक दिसतात. चालताना एक विशिष्ट आवाज करणाऱ्या या फ्लिप-फ्लॉप्स अनेक आकर्षक आणि व्हायब्रंट रंगात उपलब्ध आहेत. स्निकर्स - तसं पाहिलं तर व्यायाम करताना विशिष्ट असे शूज जिममध्ये वापरायला सांगितलं जातं. हे स्निकर्स म्हणजे जिममध्ये वापरता येतील असे शूज. परंतु, अलिकडे अनेक जण हे शूज कॅज्युअलीही वापरतात. कूल आणि रिलॅक्स फील देणारे हे स्निकर्स लेदरचे किंवा कॅनव्हासचे असतात तर त्यांचा सोल (तळवा) रबरी किंवा सिंथेटीक मटेरिअलचा असतो. लोफर्स - लेस नसलेले फ्लॅट शूज म्हणजे लोफर्स. यांचा लूक इतका सुंदर असतो की कोणत्याही प्रकारच्या पोषाखावर ते अत्यंत सहजतेनं घालता येऊ शकतात. कॅज्युअल्स, फॉर्मल्स, सेमीफॉर्मल या साऱ्यावर हे लोफर्स अगदी कूल लुक देतात. अलिकडे तर अनेक महिला या लोफर्सलाच पसंती देत आहेत. फ्लोटर्स - मोकळ्याढाकळ्या सँडल्स म्हणजे फ्लोटर्स. याचा एक रांगडा लूक आहे तसंच अगदी रफ वापर असणाऱ्या मंडळींच्या पायात हे फ्लोटर्स एकदम फिट बसतात . वापरताना अगदी निष्काळजीपणे त्या वापरल्या तरीही या फ्लोटर्सचा लूक खराब होत नाही हेच त्याचं विशेष.

- मोहिनी घारपूरे-देशमुख

Web Title: Shu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.