त्वचा हवी नितळ, निरोगी व मुलायम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2016 02:54 PM2016-06-25T14:54:13+5:302016-06-25T20:24:13+5:30

त्वचा ही आपल्या वयाचा आरसा असते. त्यासाठी महाविद्यालयीन तरुणींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण आपण तरुण दिसावं.....

The skin is smooth, healthy and soft | त्वचा हवी नितळ, निरोगी व मुलायम

त्वचा हवी नितळ, निरोगी व मुलायम

Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">त्वचा ही आपल्या वयाचा आरसा असते. त्यासाठी महाविद्यालयीन तरुणींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण आपण तरुण दिसावं, आपला चेहरा आकर्षक व टवटवीत दिसावा यासाठी आवश्यक ते उपाय करीत असतात. चित्रपटातील नायिकाही याला अपवाद नाहीत. याच सुंदरतेच्या जोरावरच अनेक नायिका आज चित्रपटसृष्टीत यशाचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यात ऐश्वर्या रॉय, दीपिका पदुकोणपासून ते आलिया भटपर्यंत सगळयाच आहेत. परंतु वयाबरोबर त्वचेचे विकार वाढण्याची शक्यताही वाढते. अशावेळी त्वचेची विशेष काळजी आवश्यक ठरते.
 
कशामुळे होतात त्वचेचे विकार?
* सतत फास्ट फूडचे सेवन करणे.
* त्वचेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असणे
* सतत धूळ, माती व प्रदूषणाच्या संपर्कात राहणे.
* त्वचेचे विकार झालेल्यांच्या संपर्कात राहणे. 
* आंघोळ किंवा घाम आल्यावर त्वचेची काळजी न घेणे  
* केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा त्वचेवर अती वापर करणे. 
 
कसे ओळखाल त्वचेचे विकार?
* त्वचेला नेहमी खाज येणे व कोरडी पडणे   तारुण्यपिटीका व पुरळ येणे
* त्वचेचा काहीभाग लालसर होणे तसेच दाह होणे
* त्वचेचे मूळ रंग बदलणे
* त्वचेला दुर्गंध येणे. 
 
कशी घ्याल त्वचेची काळजी?
* आंघोळीनंतर किंवा घाम आल्यानंतर त्वचा ओलसर असल्यास त्वचा काळजीपूर्वक कोरडी करणे तसेच जास्त घाम येणाºया ठिकाणी पावडर वापरणे.
* त्वचेवर नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणे 
* त्वचा नितळ व निरोगी राहण्यासाठी आहारदेखील महत्त्वाचा असून त्यात गाईचे तूप, बदाम, खजूर आदी सारख्या सुका मेवांचा समावेश असावा. 
* त्वचेची विशेषत: कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दुधावरची साय, चांगल्या मॉईश्चरायझरचा वापर करावा.
* त्वचेचा ओलावा टिकाविण्यासाठी पाणी भरपूर प्यावे तसेच आॅलिव्ह आॅईल किंवा तेलाचा वापर करावा. 
* त्वचेला कांती मिळविण्यासाठी किंवा उजळ रंग प्राप्त होण्यासाठी त्वचेवर ब्लिचचा वापर शक्यतो टाळावा. 
* केमिकल्सयुक्त साबणाऐवजी नैसर्गित घटक असलेल्या आयुर्वेदिक उटण्याचा वापर करावा. 

Web Title: The skin is smooth, healthy and soft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.