SMS DATING RULES: ​आवडणाऱ्या मुलीला व्हॉटस्अ‍ॅप मेसेज करताना या ६ गोष्टी टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2017 08:49 AM2017-02-06T08:49:15+5:302017-02-06T14:19:15+5:30

आपल्या आवडत्या मुलीला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज किंवा एसएमएस करताना काही गोष्टींकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा तुमची ‘लव्ह लाईफ’ म्हणजेच ‘प्रेम जीवन’ धोक्यात येऊ शकते. असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून आम्ही सांगत आहोत व्हॉट्सअ‍ॅप डेटिंगचे काही नियम, जे तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे.

SMS DATING RULES: Avoid these 6 things while making a WhatsApp message to a favorite girl | SMS DATING RULES: ​आवडणाऱ्या मुलीला व्हॉटस्अ‍ॅप मेसेज करताना या ६ गोष्टी टाळा

SMS DATING RULES: ​आवडणाऱ्या मुलीला व्हॉटस्अ‍ॅप मेसेज करताना या ६ गोष्टी टाळा

googlenewsNext
रेम आपल्याला स्वप्नावत जगात घेऊन जाते. सगळं कसं एकदम गुलाबी-गुलाबी वाटू लागते. आपल्या आवडणारा मुलगा किंवा मुलीच्या सदैव संपर्कात राहण्यासाठी आपली धडपड सुरू असते. आजकाल स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या मदतीने एकमेकांच्या ‘टच’मध्ये राहणे फारसे अवघड राहिलेले नाही. परंतु आपल्या आवडत्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज किंवा एसएमएस करताना काही गोष्टींकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा तुमची ‘लव्ह लाईफ’ म्हणजेच ‘प्रेम जीवन’ धोक्यात येऊ शकते. ‘व्हॅलेंटाईन डे’ जवळ येत असताना असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून आम्ही सांगता आहोत व्हॉट्सअ‍ॅप डेटिंगचे काही नियम, जे तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे.

१. शॉर्ट फॉर्म इंग्लिश वापरू नका

बऱ्याच जणांना शॉर्ट फॉर्म इंग्लिश लिहिणे ‘कूल’ वाटते. (उदाहरणार्थ, Wt r u doig, w8 4 me,) परंतु यामुळे एक तर तुम्हाला चांगली इंग्रजी येत नाही किंवा तुम्ही आळशी आहात असा संदेश जातो. त्यामुळे शॉर्ट फ ॉर्ममध्ये लिहिणे शक्यतो टाळावे.

२. मोठे मोठे ‘विचारी’ मसेज पाठवू नका

आजकाल कोणालाच लांबच्या लांब-मोठे मोठे मेसेज वाचण्यात रस आणि वेळ दोन्ही नाही. त्यामुळे मेसेज शक्यतो लहान आणि स्पष्ट लिहा. एकदा वाचला की, तो समोरच्या व्यक्तीला लगेच कळाला पाहिजे. अन्यथा ते तुम्हाला टाळण्यास किंवा तुमच्या मेसेजकडे दुर्लक्ष करतील.

३. रात्री-अपरात्री मेसेज करणे टाळावे

जर तुमचे प्रेम नुकतेच बहरले असेल किंवा तुमची मैत्री अजून ‘सुरूवाती’च्या टप्प्यात असेल तर रात्री-अपरात्री मेसेज करणे टाळण्यात शहाणपणा आहे. त्यातुन तुमचा समजुतदारपणा दिसेल. तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या प्रायव्हसी आणि वेळेचे जाण आहे हे कळते.

Phone chat

४. ‘सेंड’ करण्यापूर्वी मेसेज वाचा

बऱ्याचदा आपण भरभर मेसेज टाईप करून पाठवून देतो आणि मग तो वाचतो. अशावेळी जर काही चुक झाली तर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे ‘सेंड’ करण्याची घाई करू नका. आधी व्यवस्थित वाचा, ज्याला पाठवायचा आहे त्याचा नंबर बरोबर आहे का हे तपासा आणि मगच पाठवा. नाही तर नंतर ५० मेसेज करून स्पष्टीकरण द्यावे लागेल.

५. चॅटिंगवर अति वैयक्तिक प्रश्न विचारू नका

एकमेकांना जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटणे कधीही उत्तम. उगीच फोन-चॅटिंगवर ‘पर्सनल’ होण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे मेसेजमध्ये जास्त वैयक्तिक प्रश्न किंवा ज्यामुळे तुमचा प्रियकर/प्रेयस ‘आॅकवर्ड’ होईल असे प्रश्न विचारू नका विचारू नका. दुसऱ्यांची अशी खासगी माहिती इकडे-तिकडे पसरू न देण्यासाठी अशी पर्सनल चॅट डिलीट लगेच डिलीट करावी.

६. धडाधड मेसेजसचा सपाटा नका लावू

एका मागून एक असे धडाधड मेसेज पाठवून समोरच्यास हैराण करू नका. मेसेज पाठवल्यावर समोरच्यास रिप्लाय देण्यासाठी थोडा वेळ द्या. रिप्लायला उशीर होत असेल तर विचार करा की, ते कदाचित कोणत्या तरी कामा व्यस्त असतील. लगेच जाब विचारल्या सारखे मसेज पाठवू नका.

Web Title: SMS DATING RULES: Avoid these 6 things while making a WhatsApp message to a favorite girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.