​...म्हणून नवीन ठिकाणी झोप येत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 05:36 PM2016-04-26T17:36:54+5:302016-04-26T23:09:57+5:30

 प्रत्येकाला  नवीन जागी पहिल्या रात्री झोप न येण्याचा अनुभव आलाच असेल.

... so do not sleep in a new place! | ​...म्हणून नवीन ठिकाणी झोप येत नाही!

​...म्हणून नवीन ठिकाणी झोप येत नाही!

Next
ल्यापैकी प्रत्येकाला  नवीन जागी पहिल्या रात्री झोप न येण्याचा अनुभव आलाच असेल. सुट्यांमध्ये नातेवाईकांकडे किंवा कामानिमित्त दुसऱ्या शहरात हॉटेलमध्ये राहताना पहिल्या रात्री झोपच येत नाही.

मग अशा अर्धवट झोपेमुळे दुसऱ्या दिवशी पूर्णपणे अस्वस्थता जाणवते. असे का होते याचे कारण आता संशोधकांना कळले आहे.नवीन जागी झोपल्यावर आपला अर्धामेंदू हा सक्रिय राहत असल्यामुळे आपल्याला झोप लागत नाही, 

असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. अतिसंवेदनशील न्युरोइमेजिंगचा वापर करून मेंदूमध्ये होणाºया हालचालींचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये असे दिसून आले की, आपला डावा मेंदू पहिल्या रात्री सक्रिय राहतो. झोपलेल्या स्वयंसेवकांच्या कानामध्ये आवाज करून त्यांची सतर्कता तपासण्यात आली. 

दुसºया रात्री मात्र मेंदू नवीन जागेशी जुळवून घेताना दिसतो. जेव्हा उजव्या कानात आवाज करण्यात आला तेव्हा स्वयंसेवक खाडक न जागी होऊन बसले कारण उजव्या कानाचा संबंध डाव्या भागातील मेंदूशी आहे. 

Web Title: ... so do not sleep in a new place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.