SOCIAL MEDIA: आता ट्विटरला कळणार तुमचा बेस्ट फ्रेंड कोण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2017 02:17 PM2017-01-22T14:17:19+5:302017-01-22T19:47:19+5:30

तुम्ही सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्तीचे ट्विट्स तुम्ही मिस करू नयेत म्हणून ट्विटरने एक नवे फिचर लाँच केले आहे. ‘बीएफएफ मॉड्यूल’द्वारे तुमच्या लिस्टमधून एकाची निवड करून त्याचे ट्विट्स तुमच्या टाईमलाईनवर विशिष्ट जागी हाईलाईट करण्यात येतील.

Social Media: Now Twitter will know who your best friend is | SOCIAL MEDIA: आता ट्विटरला कळणार तुमचा बेस्ट फ्रेंड कोण

SOCIAL MEDIA: आता ट्विटरला कळणार तुमचा बेस्ट फ्रेंड कोण

Next
यक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर आता तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राचे लेटेस्ट ट्विट्स कधीच मिस करणार नाहीत. कारण ट्विटरने एक असे फिचर लाँच केले आहे जे तुमच्या लिस्टमधून निवडलेल्या एका व्यक्तीचे ट्विट्स तुमच्या टाईमलाईनवर हायलाईट क रेल. म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तीच्या ट्विटर अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या नव्या फिचरद्वारे आपोआप निवडण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या ट्विट्सना  तुमच्या टाईमलाईनवर एक स्पेशल जागा मिळेल. हे नवे फिचर ट्विटरच्या ‘इन केस यू मिस्ड इट’सारखेच आहे; परंतु ते केवळ एकाच व्यक्तीचे ट्विट्स तुम्हाला आवर्जुन दाखवणार.  ‘इन केस यू मिस्ड इट’मध्ये (इसीयूएमआय) तुम्हाला आवडण्याची शक्यता असणारे ट्विट्स दाखवण्यात येत असतात.

► ALSO READ: ​सोशल मीडिया मार्केटिंगचा फंडा

तुम्ही ज्या व्यक्तीच्या सर्वाधिक संपर्कात राहता त्या व्यक्तीचे ट्विट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असतात असे गृहीत धरून ट्विटर तिच्या अपडेट्स तुम्हाला वारंवार दाखवेल. ‘इसीयूएमआय’ प्रमाणे तुम्ही हे सजेशन्स बंददेखील करू शकता. या ‘बीएफएफ मोड्यूल’मध्ये तुम्ही सर्वाधिक वेळा कोणाच्या संपर्कात राहता, ती व्यक्ती तुम्हाला किती वेळा संपर्क साधते या आधारावर व्यक्तीची निवड केली जाते.

सध्या तरी ही सुविधा प्रायोगिक तत्वावर काही निवडक आयाओएस, अँड्राईड आणि वेब यूजर्ससाठी खुली करण्यात आली आहे. आता कंपनीचे हे नवे फिचर कितपत योग्य रिझल्ट देणार हे कळण्यास तुर्तास तरी काही साधन नाही. पण आतापासूनच या सुविधेची खिल्ली उडवण्यास सुरूवात झाली आहे. एका यूजरने लिहिले की, मला नाही वाटत की माझ्या लिस्टमध्ये कोणी अशी व्यक्ती असेल जिचे ट्विट्स मी आवर्जुन बघावेच अशी स्थिती आहे. त्यामुळे हे फिचर निरर्थक आहे.

ALSO READ: ​ट्विटरने वाढविली 140 कॅरेक्टर मर्यादा

Web Title: Social Media: Now Twitter will know who your best friend is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.