गतिमान एक्सप्रेस : भारतातील पहिली सेमी बुलेट ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2016 12:16 AM2016-04-06T00:16:43+5:302016-04-05T17:16:43+5:30

देशातील पहिली सेमी-बुलेट ट्रेन 'गतिमान एक्सप्रेस'चे मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे

Speed ​​Express: India's first semi-bullet train | गतिमान एक्सप्रेस : भारतातील पहिली सेमी बुलेट ट्रेन

गतिमान एक्सप्रेस : भारतातील पहिली सेमी बुलेट ट्रेन

googlenewsNext
बुलेट ट्रेनचे स्वप्न बऱ्याच वर्षांपासून आपल्याला दाखविले जात आहे. आता ते प्रत्यक्षात उरविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकण्यात आले.

देशातील पहिली सेमी-बुलेट ट्रेन 'गतिमान एक्सप्रेस'चे मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. ‘ताज महाल’ पाहण्यासाठी येणाऱ्या जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही रेल्वे सुरू करण्यात आली आहे.

दिल्ली ते आग्रा हा २०० किमी प्रवास 'गतिमान  एक्सप्रेस'मुळे केवळ शंभर मिनिटांत पूर्ण होणार आहे. 160 किमी प्रतितास एवढ्या वेगाने ही रेल्वे धावणार असून इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात आधुनिक रेल्वे आहे. आतून विमानासारखे इंटेरिअर असून गणवेशधारी स्टफ प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत केले.

Gatimaan

दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन स्टेशन ते आग्राच्या कँटोनमेंट स्टेशन दरम्यान शुक्रवार व्यतिरिक्त सहा दिवस ‘गतिमान एक्सप्रेस’ धावणार आहे. एका एसी चेयर कार सीटचे तिकिट 750 रु. तर एक्झिक्युटिव्ह एसी चेयर कारचे तिकिट 1500 रुपये इतके आहे. रेल्वेमध्ये आठ एसी चेयर डबे तर दोन एक्झिक्युटिव्ह एसी चेयर डबे आहेत.

Gatimaan

अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टिम, आॅटोमॅटिक फायर अलार्म आणि स्लायडिंग दरवाजे, मोठ्या खिडक्या , बायो टॉयलेट्स तसेच फ्री मल्टीमीडिया सर्व्हिस अशा आकर्षक सुविधा या एक्सप्रेसमध्ये देण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध पर्यटण स्थळांच्या फोटोंनी सर्व डबे सजविण्यात आले आहे.

मात्र पहिल्याच प्रवासात वायफाय आणि टीव्हीसंदर्भात अनेक अडचणी आल्या असल्या ती त्यात झपाट्याने सुधारणा करण्यात येणार आहेत.

Gatimaan

अशा प्रकारच्या नऊ रेल्वे सुरू करण्याच्या रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे ज्यामध्ये कानपूर-दिल्ली, चंदिगढ-दिल्ली, हैदराबाद-चेन्नई, नागपूर-बिलासपूर, गोवा-मुंबई आणि नागपूर-सिकंदराबाद या मार्गांचा सामावेश आहे.
{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Speed ​​Express: India's first semi-bullet train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.