स्टेपकट विथ नऊवारी अ‍ॅण्ड पुतळ्याची माळ

By admin | Published: April 3, 2017 04:59 PM2017-04-03T16:59:18+5:302017-04-03T16:59:18+5:30

नऊवारी साडी ही फॅशन स्टेटमेण्ट ठरेल असं कधी कुणाला वाटलं होतं का?पण तरुण मुलींच्या नऊवारीचे नखरे वाढलेत खरे.. गुढीपाडवा उत्साहात साजरा झाला

Steppit with nine-eyed and statue floor | स्टेपकट विथ नऊवारी अ‍ॅण्ड पुतळ्याची माळ

स्टेपकट विथ नऊवारी अ‍ॅण्ड पुतळ्याची माळ

Next
विद्या राणे-शराफ 

 

नऊवारी साडी ही फॅशन स्टेटमेण्ट ठरेल असं कधी कुणाला वाटलं होतं का?पण तरुण मुलींच्या नऊवारीचे नखरे वाढलेत खरे.. गुढीपाडवा उत्साहात साजरा झाला, आता रामनवमी. त्यात घरोघर चैत्रगौरीचं हळदीकुंकू.सेलिब्रेशनचा माहौल सर्वत्र आहेच. आणि या सेलिब्रेशनला फॅशनची जोड तर असतेच. कारण आजकाल आपल्याला सेलिब्रेशनचा बहानाच पाहिजे.

म्हणून तर गुढीपाडव्याच्या शोभायांत्रात कितीतरीजणी बाईकवर बसून फेटे घालून मस्त मिरवल्या. आणि आता तर चैत्रगौरीच्या हळदीकुंकवांनाही अनेकजणी नऊवारी नेसत आहेत. नऊवारी, सो टिपीकल म्हणून नाकं मुरडण्याचा काळ कधीच सरला. आता नऊवारीही ट्रॅडिशनली फॅशनेबल झाली आहे. ही नऊवारी साडी आता आपण म्हणून तशी शिवून मिळते. त्यामुळे हव्या त्या रंगात, हव्या त्या स्टाईलची नऊवारी घालणं ( अर्थात घालणं, नेसणं नाहीच!) हे आता ‘इझी’ झालं आहे. अगदी लहान-लहान मुलीही नऊवारी साडीत खुलून दिसतात. 

नऊवारी साड्यांमध्येही वेगवेगळे प्रकार असून, प्रत्येक महिला आपल्या आवडीनुसार साडीच्या प्रकाराला प्राधान्य देते. या साड्या बेंगलोर सिल्क, बेळगाव सिल्क, प्युअर सिल्क, ओरिसा सिल्क अशा विविध फेब्रिक्समध्ये उपलब्ध आहेत. पैठणी, इरकल, टोपपदरी या नेहमीच्या साड्या तर आहेतच. 

नऊवारीला साथ म्हणून नथ, खोपा, खोप्याची फुलं, गजरे, सोनं किंवा चांदीची फूलं किंवा कळस, बोरमाळ, चपलाहार, मण्यांची माळ, कोल्हापूरी साज हे सारंच पुन्हा फिरुन नव्यानं तरुण आयुष्यात आलं आहे. 

यासगळ्या साड्यांबरोबर कोळी स्टाईल नऊवारीही नेसण्याची एक नवी क्रेझ आहेच. या प्रकारात साडी गुडघ्यापर्यंत नेसून पदर कमरेभोवती गुंडाळला जातो. तर वरच्या बाजूला दुपट्टा लावायची पद्धत आहेच. या साडीवर अंबाडा व त्यावर गुलछडीची वेणी, झुमके, लांब मण्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, बुगडी व खास कानातले काप हे सारंच मस्ट कॅटेगरीत वापरलं जातं आहे. 

चकचकीत, नेट, बिड्स, स्टोन्सनी सजलेली नऊवारी हे चित्र जरा पचायला अवघड होतं. पण या साड्या पाहाणाऱ्याची नजर खिळवून ठेवतात. यावर प्रिन्सेस ब्लाउज खूपच खुलून दिसते. अगदी माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रपासून ते विद्या बालनपर्यंत आणि कतरिना कैफपासून ते दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांनीच अशी साडी नेसून, प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. या साडीवर स्टेप कट, लांब वेणी, अंबाडा अशी कुठलीही हेअरस्टाईल चांगली दिसते. मॅट आॅक्साइड किंवा डल गोल्ड दागिने अशा साड्यांवर अनेकजणी वापरतात.

नऊवारी इज बॅक हेच खरं!

Web Title: Steppit with nine-eyed and statue floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.