टिम कूकने शेअर केला स्टीव्ह जॉब्सचा अखेरचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2016 01:38 PM2016-08-18T13:38:21+5:302016-08-18T19:08:21+5:30
स्वत:च्या क्षमतांना कमी लेखू नको. तु हे करू शकतो आणि तु हे करून दाखवणार असा विश्वास नेहमी बाळग.
Next
ज कधी स्टीव्ह जॉब्सला विसरणार नाही. तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचे त्याचे काम सदैव आपल्याला मानवी जिद्द आणि जोखिम उचलण्याच्या हिंमतीची आठवण करून देत राहील. तो वारल्यानंतर ‘अॅपल’ची यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या टिम कूकने नुकतेच एका मुलाखतीलमध्ये स्टीव्ह जॉब्सच्या आठवणींनी उजाळा दिला.
मृत्यूपूर्वी स्टीव्हने टिमला एक सल्ला दिला होता. टिप म्हणतो, मी त्याचे आजतयागत पालन करतोय. तो सल्ला केवळ टिमसाठीच नाही तर आपल्या प्रत्येकासाठी फार मौलिक आहे. टिमने सांगितले की, ‘१९९८ साली मी जेव्हा अॅपलमध्ये आलो तेव्हा मला माहीत होते की, ही माझ्यासाठी आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे. त्याने मला दिलेला शेवटचा सल्ला होता की, स्वत:च्या क्षमतांना कमी लेखू नको. तु हे करू शकतो आणि तु हे करून दाखवणार असा विश्वास नेहमी बाळग.
टिप पुढे सांगातो की, त्याचे हे शब्द मला आजही प्रेरणा देतात. आपल्या प्रत्येकाच्या मनात स्वत:बद्दल शंका असतात. स्टीव्हने मला स्वत:वर विश्वास ठेवण्याची शिकवण दिली. मी जसा आहे, तसा राहण्याची हिंमत दिली. उगीच दुसऱ्यासारखे बनण्याचा प्रयत्न करू नये. स्वत:ची वाट स्वत: निर्माण करण्याची ऊर्जा त्याने आपल्या कार्यात आपल्या सर्वांना दिली आहे.