​‘वन इंडियन गर्ल ’ भारतीय मुलींची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2016 12:28 PM2016-08-21T12:28:55+5:302016-08-21T17:58:55+5:30

तरुणांचा लाडका लेखक चेतन भगतची आगामी कादंबरी ‘वन इंडियन गर्ल’ला प्रकाशनापूर्वीच इंंटरनेटवर तुफान प्रतिसाद मिळतोय.

The story of 'One Indian Girl' Indian girls | ​‘वन इंडियन गर्ल ’ भारतीय मुलींची कथा

​‘वन इंडियन गर्ल ’ भारतीय मुलींची कथा

googlenewsNext
ुणांचा लाडका लेखक चेतन भगतची आगामी कादंबरी ‘वन इंडियन गर्ल’ला प्रकाशनापूर्वीच इंंटरनेटवर तुफान प्रतिसाद मिळतोय. या पुस्तकाने एका आॅनलाईन शॉपिंग वेबसाईटवर प्री-आॅर्डर बुकिंगचे सर्व विक्रम मोडित काढले. भारतामध्ये इंग्रजी साहित्याची वाढती मागणी पाहता अनेक नव लेखक इंग्लिशमधून कांदबऱ्या लिहू लागले आहेत.

भारतामध्ये ‘कॅम्पस नॉव्हेल्स’ या साहित्यप्रकाराचा जनक म्हणून चेतन भगतची ओळख सांगितली जाऊ शकते. बँकर-टू-रायटर असा त्याचा प्रवास आहे. ‘फाईव्ह पॉर्इंट समवन’ या कादंबरीमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या चेतनच्या पुढील पुस्तकाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

पुस्तकाविषयी तो सांगातो की, ‘ही एका हुशार, कर्तृत्ववान आणि स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या मुलीची कथा आहे. तिच्या अशा याच गुणांमुळे खरे प्रेम तिला मिळणे कठिण जाते. आपल्या समाजात इंडिपेंडन्ट मुलींना नेहमीच डावलण्यात येते. आपण कुठे तरी याविषयी लिहावे अशी माझी इच्छा होती. म्हणूनच मी ही कादंबरी ‘स्त्रीवादी’ दृष्टीकोनातून लिहिली आहे.

एखाद्या मुलीच्या डोक्यात काय चालते, ती कसा विचार करते, आजूबाजूच्याच्या परिस्थितीकडे कशी बघते याचा शोध घेण्यासाठी मी ही कांदबरी लिहिली, असे तो सांगतो. चेतन भगतच्या यापूर्वी प्रकाशित कादंबऱ्यांवर चित्रपट बनले आहेत. या कांदबरीवर सिनेमा निघतो का हे पाहणे रंजक ठरेल.

Web Title: The story of 'One Indian Girl' Indian girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.