सुबोध भावेचे मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2016 06:03 AM2016-04-09T06:03:15+5:302016-04-08T23:03:15+5:30
‘कट्यार काळजात घुसली’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटांच्या प्रसिद्धीनंतर अभिनेता सुबोध भावे यशाच्या शिखरावर आरुढ झाला आहे.
Next
‘ ट्यार काळजात घुसली’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटांच्या प्रसिद्धीनंतर अभिनेता सुबोध भावे यशाच्या शिखरावर आरुढ झाला आहे. ‘का रे दुरावा’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर सुबोध भावे सध्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत व्यस्त आहे. यातच तो आता एक मल्याळम चित्रपट करणार असल्याचे समजते.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अदुर गोपालकृष्णन यांच्या ‘पिन्नेयुम’ या चित्रपटाद्वारे सुबोध मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. सुबोध सध्या गिरीश मोहिते दिग्दर्शित 'TTMM' आणि स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित ‘फुगे’ या चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे. त्याच बरोबर तो लावणीवर आधारित असलेल्या ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करतोय.