तुमच्या फेस टाइपनुसार सनग्लासेस निवडण्यासाठी काही खास टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 04:06 PM2019-03-26T16:06:27+5:302019-03-26T16:11:12+5:30
वातावरणातील उकाडा वाढत असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असातच घराबाहेर पडताना त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असतं.
वातावरणातील उकाडा वाढत असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असातच घराबाहेर पडताना त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. अन्यथा उन्हामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम दिसून येतात. उन्हामुळे डोळ्यांवरही अनेक परिणाम होतात. अशातच सूर्याच्या किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे घराबाहेर पडताना सूर्याच्या प्रखर किरणांपासून डोळ्यांसाठी सनग्लासेस वापर करणं फायदेशीर ठरतं.
तुम्हीही उन्हाळ्यासाठी सनग्लासेस खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्याबाबत कनफ्यूज असाल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या फेस टाइपनुसार सनग्लासेसची परफेक्ट फ्रेम निवडण्यासाठी मदत होईल. जाणून घेऊयात फेस टाइपनुसार कोणत्या फ्रेम्स तुमच्यावर सूट होतील त्याबाबत...
राउंड फेस
राउंड फेस असणाऱ्या लोकांनी सनग्लासेस निवडताना डार्क कलरच्या फ्रेमची निवड करा.
पॉइंटिड ग्लासेस, स्क्वेयर ग्लासेस, कॅट आइज फ्रेम, बटरफ्लाई ग्लासेस, ऐवीएटर्स राउंड फेस असणाऱ्या व्यक्तींसाठी परफेक्ट चॉइस ठरतो. यामुळे तुम्हाला हटके आणि क्लासी लूक मिळण्यास मदत होते.
ओवल फेस
ओवल फेस असणाऱ्या लोकांनी जास्त मोठ्या फ्रेमचे सनग्लासेस निवडणं शक्यतो टाळा.
असा चेहरा असणाऱ्या व्यक्तींनी रेक्टेंग्युलर, ओवल, राउंड, बटरफ्लाई, ऐवीएटर्स आणि कॅट आइज फ्रेम्सची निवड करा. हे सनग्लासेस तुम्हाला क्लासी लूक देण्यास मदत करतात.
स्क्वेयर फेस
स्क्वेयर फेसवर मोठी फ्रेम आणि राउंड फ्रेमचे ग्लासेस सूट करतात. छोट्या फ्रेम्सची निवड करणं शक्यतो टाळावं.
या उन्हाळ्यामध्ये स्क्वेयर फेस शेपच्या लोकांनी आपल्यासाठी मोठ्या फ्रेमचे ग्लासेस, ऐवीएटर्स, कलर्ड फ्रेम ग्लास, फ्रेमलेस ग्लास, कॅट आइज ग्लास आणि ऐवीएटर्सची निवड करू शकता.
हार्ट शेप
हार्ट शेप फेस असणाऱ्या लोकांनी मोठ्या फ्रेम्सपासून लांबच रहावं. चेहरा छोटा आणि फ्रेम्स मोठया दिसतात.
अशातच लूक बिघडण्याची शक्यता असते. त्याऐवजी त्यांनी रांउंड ग्लासेस, एवीएटर्स, फ्रेमलेस ग्लास आणि ब्राइट कलरच्या स्मॉल फ्रेम्सची निवड करावी.