​उन्हाळ्यात विना ‘एसी’ घरात असेल थंडावा !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 08:07 AM2017-05-19T08:07:50+5:302017-05-19T13:37:50+5:30

उन्हाळ्यात प्रत्येकाला घरात थंडावा हवा असतो, यासाठी बरेच उपाय केले जातात. मात्र परिणाम हा तात्पुरता असतो. जाणून घ्या, घरात थंडाव्यासाठी काय करायचे ते...!

Summer will not be in the 'AC' house! | ​उन्हाळ्यात विना ‘एसी’ घरात असेल थंडावा !

​उन्हाळ्यात विना ‘एसी’ घरात असेल थंडावा !

Next
्हाळ्यात प्रत्येकाला घरात थंडावा हवा असतो, यासाठी बरेच उपाय केले जातात. मात्र परिणाम हा तात्पुरता असतो. आज आम्ही आपणास अशा काही टिप्स देत आहोत ज्याने आपल्या घरात नेहमी थंडावा राहील. 

*अपेक्षित प्रकाश आणि खेळती हवा
घराला खुले राहू द्या. घर जेवढे बंदिस्त असेल तेवढे जास्त तापते. घरात अपेक्षित प्रकाश आणि हवा खेळती राहिल्यास घराचे तापमान कमी होते, ज्यामुळे थंडावा निर्माण होण्यास मदत होते. 

* सजावटसाठी हिरवा रंगाचा वापर
घरातील वातावरण सकारात्मक बनविण्यासाठी सजावटीसाठी हिरव्या रंगाला प्राधान्य द्या. शिवाय घरातील विविध शोभेच्या वस्तूंचा रंग देखील हिरवा असावा. घरात पुरेसा आॅक्सिजन आणि फ्रेश हवा येण्यासाठी घरात हिरवे रोपे लावा. जर बाल्कनी असेल तर त्याठिकाणीदेखील आपल्या आवडीच्या फुलांची रोपे लावू शकता. यामुळे घरातील वातावरण हेल्दी राहण्यास मदत होईल.  

* डिजिटल प्रिंटची बेडशीट-पडदे
उन्हाळ्यात कॉटनची बेडशीट खूप फायदेशीर ठरते. कॉटनची बेटशीट सहज धुतलीपण जाते. यात डिजिटल आणि फ्लोरल प्रिंटची जास्त क्रेझ आहे. ही आपणास ३डी प्रिंटमध्येही मिळू शकते. शिवाय खिडक्यांना लाइट कलरचे पडदे लावावेत. यामुळे उन्हापासून बचाव होतो. जेवढे तुम्ही लाइट कलरचे पडदे लावाल तेवढे तुमचे घर थंड असेल. 

* घराच्या छतावर पाणी मारणे
घरात थंडावा मिळावा म्हणून सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेस घराच्या छतावर पाणी मारावे. यामुळे घराच्या भिंतीचे तापमान कमी होण्यास मदत होईल. 
                                 

Web Title: Summer will not be in the 'AC' house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.