सुनील बर्वेची रेसिपी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:07 AM2016-01-16T01:07:39+5:302016-02-05T11:12:56+5:30
वेगळं काही तरी हवं खाने में कुछ मीठा तो बनता है, या उक्तीनुसार जिलबी, श्रीखंड, गुलाबजाम अशा नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला पाहिजे असतं. अशीच एक खजुराच्या बर्फीची रेसिपी सांगतोय सुनील बर्वे.
Next
स हित्य : खजूर, काजू, डिंक, बेदाणे, बदाम, साजूक तूप
कृती : प्रथम गरम भांड्यात २ चमचे तूप घालून त्यात बदाम व खजूर परतून घ्यावे. भांड्यात परतलेले बदाम, खजूर, डिंकाचा चुरा, काजू व बेदाणे एकत्र करावे. तयार मिश्रणाची लांबट गोळी तयार करून मिश्रण सेट करायला फ्रिजमध्ये ठेवावे. तयार मिश्रणाला चांदीचा वर्ख लावून त्याच्या वड्या पाडाव्यात.