​सुनील शेट्टीची पत्नी 'गिफ्ट आणि लाइफस्टाइल' स्टोरची आहे मालकिण !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2017 10:30 AM2017-06-27T10:30:35+5:302017-06-27T16:01:20+5:30

जाणून घेऊया सुनील शेट्टीच्या पत्नीची लाइफस्टाइल...!

Sunil Shetty's wife Gift and Lifestyle store! | ​सुनील शेट्टीची पत्नी 'गिफ्ट आणि लाइफस्टाइल' स्टोरची आहे मालकिण !

​सुनील शेट्टीची पत्नी 'गिफ्ट आणि लाइफस्टाइल' स्टोरची आहे मालकिण !

googlenewsNext
नील शेट्टी फक्त अभिनेताच नसून एक यशस्वी उद्योजकदेखील आहे, हे आपणास माहित आहे. मात्र सुनीलची पत्नी माना शेट्टीदेखील बिझनेसवुमन आहे. 
माना शेट्टी ‘आर-हाउस’ नावाचे एक लाइफस्टाइल स्टोर चालवते. या दोन मजल्याच्या स्टोरमध्ये डेकोरेशनचे सामान, गिफ्ट्स, लाइटिंग यांसारख्या अनेक लक्झरी गोष्टी मिळतात. विशेष  म्हणजे या स्टोरमध्ये असलेले ८० टक्के फर्निचर भारतातून तसेच जगातील इतर वेगवेगळ्या देशांतून मागविले आहे. 

माना नुसती बिझनेसवुमनच नव्हे तर एक यशस्वी सोशल वर्कर आणि रियल इस्टेट क्वीनदेखील आहे. तिचा सुनील शेट्टीसोबत ‘एस२’ नावाचा रियल इस्टेट प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईत ६ हजार ५०० स्क्वेअर फुटमध्ये पसरलेल्या परिसरात २१ लग्झरी बंगले बनविण्यात आले आहेत. याठिकाणी सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. 

माना 'सेव द चिल्ड्रन इंडिया' नावाच्या एनजीओसोबतही काम करत आहे. फंड जमा करण्यासाठी माना आराइश नावाची प्रदर्शन भरवत असते आणि जोपण पैसा येतो तो सर्व महिलांसाठी वापरण्यात येतो.

माना फॅशन डिझायनरही आहे. तिच्या बहिणीसोबत मिळून ती 'माना एंड ईशा' नावाचे कपड्यांचा ब्रँडही चालवते. मानाचे वडील आर्किटेक्ट आहेत त्यांनी संपूर्ण भारतात अनेक मोठ्या प्रोजेक्टवर काम केले आहे.

पती सुनील शेट्टी मानाला नेहमीच सपोर्ट करतो. माना सुनीलला ती 17 वषार्ची होती तेव्हापासून ओळखते. एक-दोन वर्षाच्या मैत्रीनंतर त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि ६ वर्षे डेटींग केल्यानंतर त्यांनी १९९१ साली लग्न केले. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुनील वषार्काठी १०० कोटींची कमाई करतो. सुनीलजवळ अनेक फ्लॅट, गाड्या, कार, बाईक, रेस्तरॉ आहेत. याशिवाय त्याचे एक प्रोडक्शन हाऊसही आहे. 

Web Title: Sunil Shetty's wife Gift and Lifestyle store!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.