यू ट्यूबवर ‘सुपर चॅट’ फिचर !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 06:26 PM2017-01-20T18:26:10+5:302017-01-20T18:26:10+5:30
यू ट्यूब यूजर्ससाठी आता ‘सुपर चॅट’ हे अत्यंत क्रिएटिव्ह फिचर प्रदान करण्यात येणार असून, साईटवर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याºयांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अलिकडे यू ट्यूब स्टार्स लाईव्ह स्ट्रीमिंगला खूप महत्त्व देत आहेत.
Next
य ट्यूब यूजर्ससाठी आता ‘सुपर चॅट’ हे अत्यंत क्रिएटिव्ह फिचर प्रदान करण्यात येणार असून, साईटवर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याऱ्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
अलिकडे यू ट्यूब स्टार्स लाईव्ह स्ट्रीमिंगला खूप महत्त्व देत आहेत. स्ट्रीमिंग म्हणजे विविध विषयांवरील खुमासदार भाष्य किंवा एखाद्या बाबीवर टिप्स देणे होय. यासाठीच यू ट्यूबने सुपर चॅट हे फिचर देण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत ‘सुपर चॅट’ फिचर विकत घेऊन यूजर्स लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असतांना कॉमेंट करु शकता. यामुळे त्याने त्या व्हिडीओवर केलेली कॉमेंट ही पाच तासांपर्यंत पहिल्या स्थानावर विराजमान राहणार आहे. यातून संबंधित यूजरच्या कॉमेंटला प्रसिध्दी मिळणार आहे. याचसोबत यू ट्यूब या रकमेतून स्ट्रीमिंग करणाऱ्याला त्याचा वाटादेखील देणार आहे. अर्थात त्याला यातून उत्पन्न मिळू शकते. कॉमेंट करणाऱ्या यूजर्सचा सहभाग वाढण्यासह क्रियेटर्सला उत्पन्न मिळावे म्हणून सुपर चॅट हे फिचर लॉंच करण्यात आल्याचे यू ट्यूबतर्फे त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. सध्या मोजक्या यूजर्ससाठी हे फिचर सादर करण्यात आले असले तरी येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील सर्व यूजर्सला देण्यात येणार असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.