घरातले स्वीच बोर्डही सजवता येतात. या दहा आयडिया वापरून तर बघा!
By admin | Published: May 24, 2017 06:36 PM2017-05-24T18:36:25+5:302017-05-24T18:36:25+5:30
घरातले स्वीच बोर्डही आकर्षणाचं केंद्र बनू शकतात. त्यासाठी स्वीच बोर्डचा मेकओव्हर करावा लागतो. आणि ते तर एकदम सोपं आहे.
- सारिका पूरकर- गुजराथी
आपल्या सर्वांच्याच घरात इलेक्ट्रिसिटीचा स्वीच बोर्ड असतोच. पूर्वी हे स्वीचबोर्ड लाकडी चौकोनी तुकड्यांचे असायचे, परंतु आता हे स्वीच बोर्ड प्लॅस्टिकचे असतात. किती वर्षांपासून या स्वीच बोर्डला आपण आपल्या घरात पाहातो. पण स्वीचबोर्डला हात लागतो तो बटन दाबण्यासाठीच. एरव्ही घराचा लूक चेंज करताना लादीपासून पडद्यांपर्यंत सर्व बारीक सारीक गोष्टींचा विचार करून त्यावर नव्यानं हात फिरवला जातो. पण घरातले स्वीच बोर्ड मात्र आहे तसेच राहतात, त्यांच्याकडे पाहिलं की जुनं जुनं वाटतंच. खरंतर हे स्वीच बोर्डही सजवता येतात. त्यांनाही रंगीबिरंगी बनवता येतं. घरातले स्वीच बोर्डही आकर्षणाचं केंद्र बनू शकतात. त्यासाठी स्वीच बोर्डचा मेकओव्हर करावा लागतो. आणि ते तर एकदम सोपं आहे.