टी-शर्टची किंमत एक हजार डॉलर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2016 03:57 AM2016-04-14T03:57:40+5:302016-04-13T20:57:40+5:30
‘स्नुप डॉग’चा फोटो असलेल्या टी-शर्टची किंमत आहे एक हजार डॉलर.
Next
काही दूर्मिळ वस्तूंची किंमत खरंच अवाढव्य असते. आपल्या आवडत्या किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या खाजगी वस्तू विकत घेण्यासाठी चाहते आणि संग्राहक वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात.
आता ‘स्नुप डॉग’चा फोटो असलेल्या टी-शर्टचेच उदाहरण घ्या ना. याची किंमत आहे एक हजार डॉलर (साठ हजार रु.). आता तुम्ही म्हणाल असे काय आहे या टी-शर्टमध्ये की एवढी अव्वाच्या सव्वा किंमत लावली आहे.
मान्य की, स्नुप डॉग हा प्रसिद्ध गायक आहे. त्याची स्टाईल, राहणीमान याविषयी जगभरात आकर्षण आहे. परंतु, त्याचा फोटो असलेला शर्ट घालण्यासाठी का म्हणून कोणी एक हजार डॉलर खर्च करेल?
याचे कारण तोच फोटो आहे. स्ट्रीटवेअर प्रेरित लक्झरी ब्रॅण्ड ‘वेटेमेंट्स’ने हे टी-शर्ट बनवले आहेत. प्रसिद्ध पोट्रेट फोटोग्राफर डॅन विंटर्स यांनी ‘व्हाईब’ नावाच्या मॅगझीनच्या कव्हरसाठी स्नुप डॉगचे हे छायाचित्र काढले होते.
डेथ रो रेकॉर्ड्सनेसुद्धा 1993 साली मर्चंडाईज्साठी हा फोटो वापरला होता. त्यामुळे ‘वेटेमेंट्स’ला हा फोटो टी-शर्ट वापरण्यासाठी तगडी लायसेन्स फी द्यावी लागली आहे. म्हणून या शर्टची किंमत एवढी जास्त आहे.
{{{{twitter_post_id####

}}}}Left is a Beware of Dogg promo tee from 1993 by Death Row Merchandise Inc. Right is Vetements from Riccardi Boston. pic.twitter.com/a1fzXQcMNY
— Chad (@Fourty8XL) March 22, 2016