लेगिंग्स खरेदी करताना घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2017 03:41 PM2017-01-07T15:41:18+5:302017-01-07T15:41:42+5:30

सध्या लेगिंग्स वापरणे ही जणू फॅशनच बनत चालली आहे. आज प्रत्येक तरुणी लेगिंग्स ही कुर्ता, ट्युनिक सारख्या गारमेंट्ससोबत कॅरी करताना दिसत आहे.

Take care while buying leggings! | लेगिंग्स खरेदी करताना घ्या काळजी !

लेगिंग्स खरेदी करताना घ्या काळजी !

Next
ong>-रवींद्र मोरे 

सध्या लेगिंग्स वापरणे ही जणू फॅशनच बनत चालली आहे. आज प्रत्येक तरुणी लेगिंग्स ही कुर्ता, ट्युनिक सारख्या गारमेंट्ससोबत कॅरी करताना दिसत आहे. मात्र, बऱ्याचदा आपल्या व्यक्तिमत्त्वाला सूट होईल अशी लेगिंग्स घेतली जात नाही, त्यामुळे आपला लूक हवा तसा दिसत नाही. आजच्या सदरात लेगिंग्स घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊयात.
 

लेगिंग्स आर्टिफिशअल लेदर, मॅश, लायक्रा, कॉटन स्पॅन्डेक्स सारख्या फॅब्रिक्ससोबत घालू शकता. लेगिंग्स घातल्यावर इतक्या कंफर्टेबल असतात की एक नवी फॅशनच वाटते. लेगिंग्सची वाढती क्रेझ पाहता उत्पादकांनी बॉडी टाइपप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे लेगिंग्स बाजारात उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र, आपण लेगिंग्स खरेदी करताना नेहमी गल्लत करतो, असे निदर्शनास आले आहे. 

* लेगिंग्सची लांबी
लेगिंग्स घेताना लांबीचा विचार नक्की करावा. लेगिंग्सची लांबी अँकलपेक्षा अधिक असू नये. अँकल एवढी असलेली लेगिंग्स अधिक सुंदर दिसते.

* लेगिंग्सची फिटिंग
स्कीन लेग फिट लेगिंग्स विकत घेताना फिटिंगचा नक्की विचार करावा. ही लेगिंग्स लांब असून, पातळ आणि निमुळती असावी तसेच अँकलवर संपणारी ही लेगिन्स असावी. शिवाय लेगिंग्स घेताना चांगली फर्म असलेलीच घ्या.

* योग्य अंडरविअर निवड
लेगिंग्स घालताना त्यामध्ये पॉइंटची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. लेगिंग्स सोबत कधीपण टाईट अंडरवेअर घालणं टाळा. कारण यामुळे लेगिंग्समधून पँटीची लाइन दिसते. आणि ते बघायला चांगले वाटत नाही. त्यामुळे लेगिंग्समध्ये ‘सीमलेस’ अंडरविअर घाला.

* अँकल बूट्स किंवा स्निकर्स घ्या
थंडीमध्ये आपल्या लेगिंग्सला अधिक आकर्षक बनवण्यासाठी अँकल बूट्स किंवा स्निकर्स घाला. त्याचप्रमाणे हाय बूट्स देखील लेगिंग्ससोबत चांगले वाटतात. 

* पॉप रंगाच्या आणि लेदर लेगिंग्स निवडा 
लेगिंग्स घेताना ऋतुमानाचाही विचार करावा. कोणत्या ऋतूत कोणत्या लेगिंग्स वापराव्या याबाबतही माहिती असणे गरजेचे आहे. सध्याचा हिवाळयात थंडीमध्ये लेदर आणि नियॉन सारख्या पॉप कलरच्या लेगिंग्स वापरू शकता.

* शॉर्ट टॉप घालू नका
लेगिंग्स घातल्यावर शॉर्ट टॉप घालू नका. शॉर्ट टॉपमुळे तुमचा लूक खूपच खराब दिसू शकतो. लेगिंग्ससोबत मिड थायपर्यंत येत असेल असे ट्यूनिक किंवा लाँग शर्ट कॅरी करा. 

Web Title: Take care while buying leggings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.