Tech : स्मार्टफोन घेताना ‘या’ गोष्टींकडे आवर्जून द्यावे लक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 10:58 AM2017-05-19T10:58:50+5:302017-05-19T16:28:50+5:30

बऱ्याचदा स्मार्टफोन घेताना गोंधळ उडतो. कोणता आणि कसा घ्यायचा हा आपल्यासमोर मोठा प्रश्न उपस्थित राहतो. जाणून घ्या काय काळजी घ्यावी ती...

Take a look at these 'things' while taking a smartphone! | Tech : स्मार्टफोन घेताना ‘या’ गोष्टींकडे आवर्जून द्यावे लक्ष !

Tech : स्मार्टफोन घेताना ‘या’ गोष्टींकडे आवर्जून द्यावे लक्ष !

Next
लत्या टेक्नोसिव्ह युगात स्मार्टफोन प्रत्येकासाठी गरजेचा झाला आहे. आज प्रत्येक गोष्टींसाठी स्मार्टफोन आवश्यक आहे. पण बऱ्याचदा स्मार्टफोन घेताना गोंधळ उडतो. कोणता आणि कसा घ्यायचा हा आपल्यासमोर मोठा प्रश्न उपस्थित राहतो. आज आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपण योग्य स्मार्टफोनची निवड करु शकता. 

कॅमेरा
फक्त जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा म्हणजे चांगला कॅमरा असं असतंच असं त्याचा अ‍ॅपर्चर स्पीडही पाहावा लागतो. जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल तर तुम्ही १६ मेगापिक्सेलचा आणि f/2.0 अ‍ॅपर्चर असलेला कॅमेराफोन घेऊ शकता. जर तुम्ही जास्त फोटो काढत नसाल तर ८ ते १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरेसा ठरू शकतो.

स्क्रीन साईझ
आपल्याकडे स्क्रीन साईझची क्रेझ मोठी आहे. जेवढी मोठी स्क्रीन तेवढा फोन चांगला असंच सगळ्यांना वाटतं. पण तुम्ही कुठल्या कारणासाठी स्मार्टफोन घेत आहात यावरून तुमची स्क्रीन ठरते. तुम्ही सिनेमा पाहायला किंवा गेम्स खेळण्याच्या दृष्टीने स्मार्टफोन घेणार असाल तर ५.५ इंच ते ६ इंची स्क्रीन असणारे फोन्स तुम्ही घेऊ शकता. तु्म्ही आॅफिसच्या कामासाठी किंवा फक्त ई मेल्स पाहण्यासाठी तुमच्या फोनचा वापर करणार असाल तर ५ ते ५.५ इंचाची स्क्रीन पुरेशी ठरू शकते. ६ इंचापेक्षा जास्त स्क्रीनसाईझचे फोन्स हातात धरायला फारच गैरसोयीचे ठरू शकतात.

प्रोसेसर
जर तुम्ही अनेक गेम्स खेळणार असाल तसंच मोठ्या कपॅसिटीचे फोटो आणि व्हिडिओ एडिट करणार असाल तर स्नॅपड्रॅगन ६५२ किंवा ८२०/८२१ चा प्रोसेसर असणारा फोन विकत घ्या.

बॅटरी
बॅटरीची निवड तुमच्या वापराप्रमाणे करावी. जर तुमच्या स्मार्टफोनचा वापर हेवी असेल म्हणजेच तुम्ही खूप अ‍ॅप्स आणि गेम्स खेळत असाल तर ३५०० एमएएच बॅटरी असलेला फोन तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. जर तुमचा सेलफोन वापर मर्यादित असेल तर मात्र ३००० एमएएच क्षमता असलेला फोन तुम्ही वापरू शकता.
 
आॅपरेटिंग सिस्टिम व्हर्जन
तुम्ही जर अँड्रॉईड फोन घेणार असाल तर अँड्रॉईड ६.० किंवा त्याच्या थोड्याच आधीची आॅपरेटिंग सिस्टिम असलेला फोन सिलेक्ट करा. अँड्रॉईड ७ चा फोन घेणं शक्य असेल तरच तो नक्कीच घ्यावा.

स्पीकर्स
जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर फिल्म्स आणि व्हिडिओज् बघणार असाल तर हँडसेटच्या पुढच्या भागात स्पीकर्स असावे. यामुळे तुम्ही लँडस्केप मोडमध्येही व्हिडिओ चांगल्याप्रकारे पाहू शकता.

सध्याचा काळ फक्त जाहिरातींना भुलून स्मार्टफोन घ्यायचा नाही. तुमच्या गरजेनुसार अनेक स्मार्टफोन्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या स्पेसिफिकेशन्सचा अभ्यास करून जर मोबाइल निवडला तरच तो तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो.

Web Title: Take a look at these 'things' while taking a smartphone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.