सणानिमित्त तयार होण्यासाठी माधुरीचा लूक ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 03:00 PM2018-09-20T15:00:31+5:302018-09-20T15:01:41+5:30
सण-उत्सव सुरू असून तुम्हीही त्यासाठी वेगवेगळे ट्रेडिशनल लूक ट्राय करण्याचा विचार करत आहात का? मग टेन्शन नका घेऊ. बॉलिवूड अभिनेत्री आणि अद्यापही लाखो तरूणांच्या हृदयाची धडकन असणाऱ्य़ा 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितकडून ड्रेसिंग टिप्स घेऊ शकता.
सण-उत्सव सुरू असून तुम्हीही त्यासाठी वेगवेगळे ट्रेडिशनल लूक ट्राय करण्याचा विचार करत आहात का? मग टेन्शन नका घेऊ. बॉलिवूड अभिनेत्री आणि अद्यापही लाखो तरूणांच्या हृदयाची धडकन असणाऱ्य़ा 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितकडून ड्रेसिंग टिप्स घेऊ शकता. सध्या माधुरी मोठ्या स्क्रिनपासून लांब असली तरीदेखील माधुरी ऑफ स्क्रिन आपल्या स्टायलिश लूक आणि ट्रेडिशनल ड्रेसिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेते.
जेव्हा ट्रेडिशनल ड्रेसिंगचा विषय निघतो त्यावेळी सर्वात आधी विषय निघतो तो म्हणजे साडीचा. माधुरीचा साडीमधील ग्लॅमरस लूक पाहून तिच्या सौंदर्याची भूरळ पडल्याशिवाय राहणार नाही. माधुरीने गोल्डन साडीवर घातलेला डीप ग्रीन ब्लाउज शोभून दिसत आहे. याशिवाय पिंक कलरची फ्लोरर साडीही माधुरीला शोभून दिसत आहे. जर शक्य असेल तर फेस्टिव्ह सिझनमध्ये तुम्हीही माधुरीचा लूक ट्राय करू शकता.
फक्त साडीच नाही तर ट्रेडिशनल आणि एथनिक वेअरमध्येही माधुरीचे लूक फार हटके आहेत. तुम्हीही माधुरीकडून ड्रेसिंग टिप्स घेऊन फेस्टिव्ह सीजनमध्ये लेहंगा वेअर करू शकता. अंकिता डोंगरेने डिझाइन केलेला पिंक लेहेंगा घातल्याने माधुरी फार सुंदर दिसत होती.
जर तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तर साडी नेसताना तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्ही फ्युजन साडीदेखील नेसू शकता. तुम्ही माधुरीप्रमाणे साडी गाउन किंवा लेहंगा घालू शकता. गौरव गुप्ताने डिझाइन केलेल्या ग्रीन साडी गाउनमुळे माधुरीचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. पिंक कलरच्या लेहेंग्यामध्ये माधुरी सुंदर दिसत होती.
या दिवसांमध्ये लॉन्ग कुर्ता विथ लॉन्ग स्कर्टचा लूकही जास्त ट्रेन्डींगमध्ये आहे. तुम्हीही माधुरीप्रमाणे हा लूक ट्राय करू शकता. ट्रेडिशनल लूकसाठी तुम्हीही माधुरीप्रमाणे ब्लॅक कलरचा किंवा कॉन्ट्रास्टींग रंगाचा लॉन्ग स्कर्ट ट्राय करू शकता.
अनारकली ड्रेसमधील माधुरीचा लूक सध्या ट्रेन्डमध्ये आहे. एथनिक आणि ट्रेडिशनल ड्रेसप्रमाणेच तुम्ही हा लूकही ट्राय करू शकता.