तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 06:52 PM2024-05-02T18:52:14+5:302024-05-02T18:53:10+5:30
#MakeEverydaySparkle साठी तयार करण्यात आलेले दागिने
एप्रिल, २०२४: अक्षय तृतीयेचा सण जवळ येतोय. या निमित्ताने भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य, तनिष्कने सादर केली आहे दररोज वापरता येतील अशा आधुनिक दागिन्यांची शानदार आणि बहुउपयोगी श्रेणी - ग्लॅमडेज. जगभरातील डिझाइन्सनी प्रेरित होऊन, शान आणि आधुनिक फॅशनचे सौंदर्य यांना एकत्र आणून तयार करण्यात आलेल्या ग्लॅमडेजचे दागिने तुमची दररोजची स्टाईल अजून जास्त वाढवतील आणि प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमधील एक बहुमूल्य ऍडिशन ठरतील. नवी श्रेणी प्रस्तुत करण्याबरोबरीनेच तनिष्क आपल्या सर्व स्टोर्समध्ये स्टायलिंग सेशन्सचे देखील आयोजन करणार आहे. ग्राहकांची वैयक्तिक स्टाईल आणि व्यक्तिमत्त्व यांना अनुसरून सर्वोत्कृष्ट आणि रोज वापरले जाऊ शकतील असे दागिने निवडण्यात ग्राहकांच्या मदतीसाठी तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शनासह खरेदीचा व्यक्तिगत अनुभव ग्राहकांना प्रदान करण्यासाठी ही स्टायलिंग सेशन्स डिझाईन करण्यात आली आहेत.
यामध्ये १०००० पेक्षा जास्त अनोखी डिझाइन्स आहेत. दररोज एक शानदार नवीन लूक बनवून तुम्ही व तुमचे दागिने करतील #MakeEverydaySparkle. जागतिक स्तरावरील अनेक वेगवेगळ्या डिझाइन्सपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ग्लॅमडेजमध्ये दररोजच्या सौंदर्याची नवी व्याख्या तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये रोज वापरण्याजोग्या स्टायलिश पण बहुउपयोगी दागिन्यांचा समावेश आहे. दर दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही हे दागिने खूप सहजपणे वापरू शकाल. नाजूक सौंदर्य दर्शवणारी फ्लोरल पेंडंट, बोल्ड तरीही रिफाईंड गोल्ड हूप्स, प्रत्येकवेळी प्रत्येकाला आवडणाऱ्या इन्फिनिटी रिंग्स असोत किंवा सुंदर गोल्ड ब्रेसलेट असोत, ग्लॅमडेजमध्ये सोने आणि हिऱ्यांपासून बनवण्यात आलेल्या दागिन्यांची आधुनिक श्रेणी आहे.
दिवसभराच्या सोफिस्टिकेशनला संध्याकाळच्या ग्लॅमरमध्ये खूप सहजपणे बदलण्याची जादू या दागिन्यांमध्ये आहे. दर दिवशी नवीन, सुंदर लुक बनवता यावा यासाठी अनेक वेगवेगळ्या स्टाईल्स यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आपल्या ग्राहकांना सोनेरी आनंद प्रदान करण्यासाठी तनिष्कने सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर आणि डायमंड ज्वेलरीच्या मूल्यावर २०% पर्यंतची सूट देण्यात आली आहे. तनिष्कमध्ये 'गोल्ड एक्स्चेंज प्रोग्राम' चे देखील लाभ मिळवता येतील. यामध्ये भारतातील कोणत्याही सोनाराकडून खरेदी करण्यात आलेल्या जुन्या सोन्यावर १००% एक्स्चेंज मूल्य दिले जाते.
सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत ग्राहकांच्या सुविधेसाठी तनिष्कने गोल्ड रेट प्रोटेक्शन योजना प्रस्तुत केली आहे. यामध्ये ग्राहक आगाऊ बुकिंग करून सोन्याच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीपासून संरक्षण मिळवू शकतात. या ऑफर्सचा लाभ फक्त मर्यादित कालावधीतच घेता येईल. या श्रेणीतील प्रत्येक दागिना आजच्या महिलांच्या धावपळीच्या, व्यस्त जीवनशैलीला अनुसरून विचारपूर्वक डिझाईन करण्यात आला आहे. दागिन्यांची ही विशाल श्रेणी १८ आणि २२ कॅरेट सोन्यामध्ये तयार करण्यात आली आहे.
जगभरातील डिझाइन्सपासून घेतलेली प्रेरणा आणि अनोख्या तंत्रांचा वापर करून तयार करण्यात आलेले ग्लॅमडेजचे दागिनेदररोजच्या लूकसाठी अतिशय उत्कृष्ट साथीदार ठरतील. पॉलिश्ड प्रोफेशनल लूक असो, कुटुंबासोबत डिनर असो किंवा घरीच सुट्टीचा दिवस घालवणे असो, तुम्ही हे दागिने अगदी सहजपणे वापरू शकाल आणि स्वतःची स्टाईल तयार करू शकाल. तुमचे दागिने तुमच्या अभिव्यक्तीचा भाग बनावेत, दागिन्यांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढावा ही तनिष्कची बांधिलकी ग्लॅमडेजमध्ये दिसून येते.
नेकलेस, इयररिंग्स, ब्रेसलेट्स, रिंग्स असे विविध दागिने ग्लॅमडेजमध्ये आहेत, त्यांच्यासह तुम्ही तुमचा वैयक्तिक लूक तयार करू शकता, जो तुमची आवडनिवड आणि रोजची स्टाईल यांना अनुरूप असेल.
तुमच्या रोजच्या स्टाईलला अनुरूप अशा सर्वोत्कृष्ट ऍक्सेसरीज निवडा आणि #MakeEverydaySparkle करा. सर्व तनिष्क स्टोर्स आणि https://www.tanishq.co.in/dailywear?lang=en_IN वर ग्लॅमडेज उपलब्ध आहे आणि रेन्जच्या किमती १५,००० रुपयांपासून पुढे आहेत.