​लैंगिक शिक्षणांमध्ये स्त्री-पुरूष समानता शिकवावी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2016 12:07 AM2016-04-10T00:07:20+5:302016-04-09T17:17:17+5:30

लैंगिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना गर्भधारणा आणि लैंगिक आजारांबरोबरच स्त्री-पुरुष समानतेचेही धडेही द्यावेत.

Teach gender equality in sex education | ​लैंगिक शिक्षणांमध्ये स्त्री-पुरूष समानता शिकवावी

​लैंगिक शिक्षणांमध्ये स्त्री-पुरूष समानता शिकवावी

Next
रतामध्ये लैंगिक शिक्षणावरून बरेच मतभेद आहेत. परंतु महिलांवर वाढणारे अत्याचार लक्षात घेता नुकतेच झालेल्या एका संशोधनातून चांगला मार्ग मिळू शकतो.

लैंगिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना गर्भधारणा आणि लैंगिक आजारांबरोबरच स्त्री-पुरुष समानतेचेही धडेही द्यावेत, अशी सुचना संशोधनकांनी केली आहे.

लैंगिक शिक्षणामध्ये महिलांचा आदर करण्याची शिकवण विद्यार्थ्यांना जर आपण वाढीच्या वयातच दिली तर त्यांचा महिलांप्रती दृष्टीकोन सकारात्मक होईल.

स्त्री म्हणजे केवळ लैंगिक सुख आणि अधिकार गाजविण्याच्या गोष्टी नाहीत. त्यांच्या मतांचा, विचारांचा, निर्णयांचा स्वीकार करण्याची वृत्ती मुलांमध्ये रुजविण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे.

शाळेत, रस्त्यांवर मुलींना उद्देशून केलेली शेरेबाजी ही देखील मोठी समस्या आहे. सेक्स विषयी बोलताना पुरूष महिलांची भूमिका नेहमी दुय्यमच मानतो. विचारधारा बदलण्यासाठी रोजच्या व्यवहारात होणाऱ्या चर्चा आणि कृतींमध्ये बदल करणे अतिशय गरजेचे आहे.

Web Title: Teach gender equality in sex education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.