TECH : अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलला अजून करुया सुरक्षित !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2017 01:00 PM2017-02-25T13:00:34+5:302017-02-25T18:31:14+5:30

अ‍ॅण्ड्रॉइडचा मुख्य आधार असलेले ‘गुगल खाते’ चुकूनही इतरांच्या हातात पडले तर, त्याचा किती दुरुपयोग होऊ शकतो..

TECH: Android smartphones are still safe! | TECH : अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलला अजून करुया सुरक्षित !

TECH : अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलला अजून करुया सुरक्षित !

googlenewsNext
प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोय. आपला हा अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोन अधिकच स्मार्ट बनत चालला आहे. कारण हल्ली कार्यालयीन कामांपासून बँकेच्या व्यवहारांपर्यंतच्या अनेक गोष्टी स्मार्टफोनच्या माध्यमातूनही केल्या जातात.

मात्र हे करत असताना स्मार्टफोनला विशेषत: अ‍ॅण्ड्रॉइड आॅपरेटिंग सिस्टीमवर आधारित मोबाइलना भेडसावणारा गोपनीयता किंवा सुरक्षिततेचा मुद्दा आपण विसरून जातो. अ‍ॅण्ड्रॉइडचा मुख्य आधार असलेले ‘गुगल खाते’ चुकूनही इतरांच्या हातात पडले तर, त्याचा किती दुरुपयोग होऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्यामुळे आपल्या गुगल खात्याला ‘द्विस्तरीय सुरक्षा’ (टू फॅक्टर आॅथंटिकेशन) असणे महत्त्वाचे आहे.

द्विस्तरीय सुरक्षा पद्धती अतिशय उपयुक्त आहे. या रचनेमध्ये तुम्ही प्रत्येक वेळी नवीन ठिकाणाहून किंवा नवीन उपकरणावरून गुगल खाते सुरू करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला पासवर्डसोबतच आपल्या मोबाइलवर आलेला सहा अंकी कोडक्रमांकही सोबत टाकावा लागतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला तुमच्या गुगल खात्याचा पासवर्ड माहीत असला तरी, या सहा अंकी कोडशिवाय ती व्यक्ती तुमचे गुगल खाते सुरूच करू शकणार नाही. अशी सुरक्षा व्यवस्था कशी तयार करायची ते आपण जाणून घेऊ.

कशी कराल ‘द्विस्तरीय सुरक्षा’
आपल्या अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘गुगल’ हा पर्याय निवडा. त्यामध्ये ‘साइन इन अ‍ॅण्ड सिक्युरिटी’वर क्लिक करा. तुम्ही ‘वेब ब्राऊजर’मध्ये जाऊन ‘गुगल अकाऊंट सिक्युरिटी’ वेबसाइटवरूनही ही प्रक्रिया करू शकता.
‘गेट स्टार्टेड’वर क्लिक करा. या वेळी तुम्हाला तुमच्या गुगल खात्याचा पासवर्ड विचारला जाईल. तो नमूद करा.
या ठिकाणी अ‍ॅड रिकव्हरी इन्फर्मेशनच्या पर्यायात ‘अ‍ॅड फोन’चा पर्याय निवडा. त्यात तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवा. काही क्षणातच या मोबाइल क्रमांकावर तुम्हाला ‘गुगल’कडून सहा अंकी ‘व्हेरिफिकेशन कोड’ मिळेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा वेगळ्या ठिकाणाहून किंवा उपकरणावरून ‘गुगल खाते’ सुरू करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्ही नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर तुम्हाला नवीन ‘व्हेरिफिकेशन कोड’ पाठवण्यात येईल.

सतर्क रहा
* तुमच्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनमध्ये ‘साइन इन अ‍ॅण्ड सिक्युरिटी’ पेजवर जा. त्यामध्ये ‘रिसेन्टली यूज्ड डिव्हायसेस’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच, तुम्हाला तुमचे गुगल खाते ‘सक्रिय’ राहिलेल्या संगणकांच्या आयपी अ‍ॅड्रेस आणि ठिकाणांची माहिती मिळते.

Web Title: TECH: Android smartphones are still safe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.