TECH : अॅपच्या साह्याने चेहरा परिवर्तीत करा इमोजीमध्ये !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2017 01:02 PM2017-04-05T13:02:44+5:302017-04-05T18:32:44+5:30
चेहऱ्यालाच इमोजीमध्ये परिवर्तीत करण्याचे काम हे अॅप करणार आहे. जाणून कोणते आहे ते app
Next
स ्या इमोजी हा स्मार्टफोनधारकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. नेमकी हिच निकड लक्षात घेऊन फेसट्युन या कंपनीने चेहऱ्याला विविध प्रकारच्या इमोजींमध्ये परिवर्तीत करणारे ‘मेमोजी’ हे विशेष अॅप यूजर्ससाठी लाँच केले आहे.
इमोजींचा वापर आपण सोशल मीडिया तसेच विविध मॅसेंजर्सवर विविध भावनांशी संबंधीत बाबींना शेअर करण्यासाठी अतिशय मुक्तपणे करत असतो. या पार्श्वभूमिवर थेट आपल्या चेहऱ्याला इमोजीमध्ये परिवर्तीत करण्याचे काम ‘मेमोजी’ हे अॅप करणार आहे. याच्या माध्यमातून कुणीही युजर सेल्फी काढल्यानंतर त्या प्रतिमेवर विविध फिल्टर्सच्या माध्यमातून प्रक्रिया करत त्याची इमोजी तयार करता येते. सध्या युजर्सला विविध प्रकारचे 11 फिल्टर्स उपलब्ध करण्यात आले असून यात लवकरच इतरांची भर पडणार आहे. हे मोफत अॅप प्रारंभी आयओएस प्रणालीसाठी सादर करण्यात आले असले तरी लवकरच अँड्रॉइडचा वापर करणाऱ्यानाही ते उपलब्ध करण्यात येणार आहे.