TECH : कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये येणारे व्हायरस टाळण्यासाठी !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 12:44 PM2017-04-14T12:44:57+5:302017-04-14T18:14:57+5:30
बऱ्याचदा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर इंटरनेट सर्फिंग करताना नकळत व्हायरस शिरतो. मात्र काही गोष्टींची काळजी घेतल्यास सिस्टिमला होणारा वायरसचा धोका टाळू शकतो.
Next
बऱ्याचदा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर इंटरनेट सर्फिंग करताना नकळत व्हायरस शिरतो. यामुळे आपल्या एवढ्या महागड्या डिवाइसला हानी पोहचते. मात्र काही गोष्टींची काळजी घेतल्यास सिस्टिमला होणारा वायरसचा धोका टाळू शकतो.
काय काळजी घ्याल?
* हॉलिवूडच्या सेलिबे्रटींना सर्च करताना
बहुतांश हॉलिवूडच्या सेलिब्रेटींना सर्च करताना आपल्या संगणकात किंवा लॅपटॉपमध्ये व्हायरस शिरू शकतो. कारण प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या नावासोबत अनेकदा मालवेअर व वायरस अटॅच असतात. २०१५ मध्ये इंटेल सिक्युरिटी ग्रुपने मोस्ट डेंजरस सेलिब्रिटींच्या नावांची यादी जाहीर केली होती. यांना सर्च केल्याने सिस्टिममध्ये २० टक्के वायरस येतात. यामध्ये कॅटी पेरी, ब्रिटनी स्पिअर्स, ल्यूक ब्रायन यासारखी नावे समाविष्ट आहेत. म्हणून सेलिब्रिटींचे सिक्रेट फुटेज, कॉन्ट्राव्हर्सिजवर क्लिक करताना सतर्क राहा. विश्वासार्ह वेबसाईट किंवा सेलिब्रिटींच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊनच माहिती घ्या.
* सुरक्षित वेबसाईट ओळखा
आतापर्यंत http हे प्रत्येक वेबसाईटच्या विश्वासार्हतेचे मानक मानले जायचे. परंतु अनेकदा http वेबसाईटवरूनही वायरस येतात. म्हणून कुठल्याही अनोळखी वेबसाईटवर जाताना http च्या आधी लॉकचा लोगो आहे किंवा नाही हे तपासून घ्या.
* क्लाऊड सर्व्हिसचा वापर करताना सावध राहा
क्लाऊड सर्व्हिस आपला डेटा सुरक्षित ठेवण्याचे एक माध्यम मानतो मात्र यामार्फत तुमच्या सिस्टिममध्ये सहज वायरस येऊ शकतो. क्लाऊड सर्व्हिसचा वापर करताना डेटा एन्क्रिपशन मोडवर असल्याची खात्री करून घ्या.
* अद्ययावत अँटीव्हायरस इन्स्टॉल करा
अँटीवायरस अपडेट असल्यावरच चांगले काम करतो. कॉम्प्युटरमध्ये दररोज वायरस, वॉर्म्स आणि ट्रोजन हॉर्सेस तयार होतात. यांच्याशी लढण्यासाठी अँटीवायरस अपडेट असणे आवश्यक आहे.
* आॅनलाईन मूव्ही पाहणे सुरक्षित
टोरंटसारख्या मालवेअर फ्री वेबसाईटवरून सिनेमा, गाणी किंवा अन्य मीडिया डाऊनलोड करताना तो वायरस इन्फेक्टेड नाही, याची खात्री करून घ्या. मूव्ही डाऊनलोड करण्यापेक्षा आॅनलाईन पाहणे अधिक सुरक्षित आहे.