TECH : ​कॉम्प्युटरवर स्मार्टवर्क करण्यासाठी खास ट्रिक्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2017 11:49 AM2017-06-03T11:49:28+5:302017-06-03T17:19:28+5:30

आपणास कॉम्प्युटरबाबत बऱ्याच गोष्टी माहित नसल्याने काम करताना वेळ वाया जातो आणि कामात अडथळाही येतो.

TECH: Computer tricks for smartwork! | TECH : ​कॉम्प्युटरवर स्मार्टवर्क करण्यासाठी खास ट्रिक्स !

TECH : ​कॉम्प्युटरवर स्मार्टवर्क करण्यासाठी खास ट्रिक्स !

Next
ण बहुतांशजण कॉम्प्युटरचा वापर करीत असाल. कारण बरेच काम हे कॉम्प्युटरवरच होत असते. त्यामुळे कॉम्प्युटर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र आपणास कॉम्प्युटरबाबत बऱ्याच गोष्टी माहित नसल्याने काम करताना वेळ वाया जातो आणि कामात अडथळाही येतो. मात्र अशा काही ट्रिक्स आहेत ज्यांच्या साह्याने आपण कॉम्प्युटरवर स्मार्टवर्क क रु शकता. 
चला जाणून घेऊया त्या ट्रिक्सबाबत :

* तुम्ही एखादी खासगी गोष्टी सर्च करीत असाल आणि तुमची URL आपल्या कॉम्प्युटरच्या हिस्ट्रीमध्ये नको असेल तर तुम्ही ctrl+shift+N टाईप करा. असं केल्यानंतर तुमच्या हिस्ट्रीमध्ये काहीही सेव्ह होणार नाही.

* आपण काम करताना बऱ्याचदा कॉम्प्युटरवर दोन विंडोजचा वापर करतो. मात्र एकावेळी एकच विंडा दिसते. दोन्ही विंडोज दिसण्यासाठी आपल्या किबोर्डवरील विंडो बटनाला राईट आणि लेफ्ट अ‍ॅरोसोबत एकत्र प्रेस करा. आपल्याला दोन्ही विंडो कॉर्नरला एकत्र आलेल्या दिसतील. 

* ज्यावेळी कोणत्याही ब्राऊझरमध्ये ब्राऊझिंग करत असाल तर खाली जाण्यासाठी स्पेस बारचा उपयोग करा आणि वरती जाण्यासाठी Shift की बरोबर स्पेस बारला प्रेस करा.

* बऱ्याचदा काम करताना चुकून कॉम्प्युटर बंद होतो आणि आपण डिस्टर्ब होतो. अशावेळी 
 ctrl+shift+T  टाईप करा. आपला टॅब ओपन होईल.

* आपल्या कॉम्प्युटरची बॅटरी सेव्ह करण्यासाठी तुम्ही बॅटरी सेव्हिंग मोड आॅन करु शकता. तसेच आपल्या संगणकाचा डिस्प्ले डिम करु शकता. त्यामुळे बॅटरी सेव्ह होते.

Also Read : ​संगणकातील F1 ते F12 या key चा काय आहे उपयोग !

Web Title: TECH: Computer tricks for smartwork!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.