TECH : ​आपण तीन डिस्प्लेचा लॅपटॉप बघितला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2017 09:54 AM2017-03-30T09:54:53+5:302017-03-30T15:24:53+5:30

एका नामांकित कंपनीने एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन डिस्प्लेयुक्त शिवाय फोर-के रेझोल्युशन असणारा गेमिंग लॅपटॉप सादर केला आहे.

TECH: Did you see three display laptops? | TECH : ​आपण तीन डिस्प्लेचा लॅपटॉप बघितला का?

TECH : ​आपण तीन डिस्प्लेचा लॅपटॉप बघितला का?

googlenewsNext
ा नामांकित कंपनीने एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन डिस्प्लेयुक्त शिवाय फोर-के रेझोल्युशन असणारा गेमिंग लॅपटॉप सादर केला आहे. रेझर या कंपनीने हा लॅपटॉप ‘कंज्युमर इलेक्ट्रॉनिक शो’मध्ये नुकताच लॉन्च केला आहे. या कंपनीने ‘प्रोजेक्ट वलेरी’च्या अंतर्गत हे गेमिंग लॅपटॉप विकसित केला असून यातील मुख्य स्क्रीनच्या मागे दोन डिस्प्ले स्वयंचलीत पध्दतीने दडलेले असतात. लॅपटॉप सुरू केल्यानंतर हे डिस्प्ले कार्यान्वित होतात. यामुळे कुणालाही एकच वेळेस तीन विविध कामे करता येतात. विशेषत: गेमिंगमध्ये याच्या मदतीने अतिशय उत्तम पध्दतीने विविध गेम्सचा आनंद लुटता येतो. यात आठ जीबी व्हिडीओ रॅमसह एनव्हिडीयाचे जीफोर्स जीटीएक्स १०८० ग्राफीक कार्ड आहे. याची रॅम तब्बल ३२ जीबी इतकी आहे.
याच्या जोडीला एनव्हिडीयाचीच ‘सराऊंड साऊंड’ प्रणालीदेखील देण्यात आली आहे. रेझरने अद्या फक्त या लॅपटॉपला प्रदर्शीत केले असल्यामुळे यातील सर्व फिचर्स व महत्वाचे म्हणजे याचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र हे मॉडेल सुमारे सहा हजार डॉलर्सच्या आसपास मिळणार असल्याचे मानले जात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जागतिक बाजारपेठेत हे मॉडेल सादर करण्यात येईल असे कंपनीने संकेत दिले आहेत.

Web Title: TECH: Did you see three display laptops?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.