TECH : आता यू ट्यूबवरुन मोबाइलवर डाऊनलोड करा व्हिडीओ !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2017 01:58 PM2017-01-27T13:58:03+5:302017-01-27T19:28:03+5:30

एखादा आवडलेला व्हिडीओ आपणास पुन्हा-पुन्हा पाहायचा असेल आणि आपल्याकडे इंटरनेटचा अभाव असेल तर अशा परिस्थितीत व्हिडीओला एका प्रयत्नात डाऊनलोड करणे हा एकच पर्याय आपल्याकडे आहे..

TECH: Download YouTube from YouTube now! | TECH : आता यू ट्यूबवरुन मोबाइलवर डाऊनलोड करा व्हिडीओ !

TECH : आता यू ट्यूबवरुन मोबाइलवर डाऊनलोड करा व्हिडीओ !

Next
ट्यूब सर्वांच्या मनोरंजनाचा एक मोठा स्त्रोत बनला आहे. कोणत्याही प्रकारच्या माहितीपासून ते फनी व्हिडिओ आपण आॅनलाइन यू ट्यूबवर पाहू शकता, मात्र एखादा आवडलेला व्हिडीओ आपणास पुन्हा-पुन्हा पाहायचा असेल आणि आपल्याकडे इंटरनेटचा अभाव असेल तर अशा परिस्थितीत व्हिडीओला एका प्रयत्नात डाऊनलोड करणे हा एकच पर्याय आपल्याकडे आहे. यासाठी आपल्या मदतीसाठी आम्ही अगदी सोपी पद्धत सांगत असून एक अ‍ॅप्लिकेशनच्या साह्याने आपण सहज यू ट्यूबवरुन व्हिडीओ डाऊनलोड करु शकता.  
Snaptubeया अ‍ॅपच्या साह्याने आपण व्हिडिओ डाऊनलोड करुन आनंद घेऊ शकता.

Snaptube चा वापर कसा कराल?

* आॅफिशियल वेबसाइट snaptubeapp.com वरुन आपण snaptube apk फाइल डाऊनलोड करा.

* आता डाऊनलोड केलेली apk फाइल डाऊनलोड करा. 

* आता यू ट्यूब सिलेक्ट करा आणि आपणास जो व्हिडीओ हवा आहे तो यूट्यूबवर सर्च करा. 

* व्हिडीओवर क्लिक केल्यानंतर खाली दिलेल्या डाऊनलोड बटनावर क्लिक करा. 

* आता आपणास ज्या फॉर्मेटमध्ये व्हिडीओ हवा त्या फॉर्मेटला सिलेक्ट करा आणि व्हिडीओचा आनंद घ्या.

* snaptub वरुन आपण केवळ यूट्यूबवरुनच नव्हे तर अन्य वेबसाइट जसे फेसबुक, इन्स्टाग्राम, डेलिमोशन आदी वेबसाइटवरुनही व्हिडीओ डाउनलोड करु शकता.

टीप : snaptub गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध नाही. 

Web Title: TECH: Download YouTube from YouTube now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.