Tech : टिनएजर्सच्या सुरक्षिततेसाठी फेसबुकचे खास चॅटिंग अॅप !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2017 01:39 PM2017-06-10T13:39:59+5:302017-06-10T19:09:59+5:30
टिनएजर्सला सुरक्षितपणे चॅटिंग करता यावे यासाठी फेसबुक एक नवीन अॅप विकसित करीत आहे.
Next
ट नएजर्सला सुरक्षितपणे चॅटिंग करता यावे यासाठी फेसबुक एक नवीन अॅप विकसित करीत आहे. ‘टॉक’ नावाचे हे अॅप असून ते लवकरच लॉन्च करण्यात येणार असल्याचे समजते.
सध्या सायबर क्राइम वाढत असून त्या माध्यमातून किशोरवयीन मुलां-मुलींची व्यक्तिगत माहिती चोरुन त्यांना ब्लॅकमेलिंग केले जाते आणि त्यांचे भावनिक अथवा शारीरिक शोषण केले जाते. याच पार्श्वभूमिवर फेसबुकने खास टिनएजर्ससाठी ‘टॉक’हे अॅप विकसित केले आहे. हे अॅप १३ वर्षावरील मुले वापरू शकतील. महत्वाचे म्हणजे फेसबुकवर अकाऊंट नसले तरी याला वापरता येणार आहे.
यात फेसबुक मॅसेंजरप्रमाणेच एकमेकांशी चॅटींगच्या माध्यमातून संवाद साधता येईल. मात्र अन्य अॅपपेक्षा हे अधिक सुरक्षित असेल. यात संबंधीत मुला-मुलींच्या पालकांचे त्यांच्या संवादावर लक्ष असेल. या अॅपचा डेटाबेस हा सर्चेबल नसेल. अर्थात यामुळे त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांचे शोषण करणे अशक्य होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फेसबुक मॅसेंजरच्या ‘सोर्स कोड’मधून या अॅपची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Also Read : TECH : आता डेस्कटॉपवरही फेसबुक लाईव्ह व्हिडिओचा आनंद घेता येणार !