TECH : ‘जिओ’चा 4जी स्वस्त लॅपटॉप लवकरच !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2017 11:35 AM2017-04-06T11:35:38+5:302017-04-06T17:05:38+5:30

एकापेक्षा एक सरस आॅफर देणारी रिलायन्स जिओ कंपनी आता आपल्या ग्राहकांसाठी अगदी स्वस्तात 4जी लॅपटॉप घेऊन येत आहे

TECH: 'Geo' 4G cheap laptop soon! | TECH : ‘जिओ’चा 4जी स्वस्त लॅपटॉप लवकरच !

TECH : ‘जिओ’चा 4जी स्वस्त लॅपटॉप लवकरच !

Next
ल्या यूजर्सला एकापेक्षा एक सरस आॅफर देणारी रिलायन्स जिओ कंपनी आता आपल्या ग्राहकांसाठी अगदी स्वस्तात 4जी लॅपटॉप घेऊन येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, जिओ लवकरच 4जी सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे. जिओच्या या लॅपटॉपमध्ये 4जी सिम कार्ड स्लॉट असल्याने इंटरनेटचा वापर यावर सहजशक्य होणार आहे. 
‘फॉक्सकॉन’ ही कंपनी या लॅपटॉपची निर्मिती करणार असून हा लॅपटॉप 13.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असणार आहे. शिवाय व्हिडीओ कॉलिंगसाठी एचडी कॅमेरादेखील असणार आहे. याशिवाय स्लिम कि-बोर्ड असणार आहे. लॅपटॉपमध्ये इंटेल पेंटियम क्वाड-कोअर प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मेमरी असू शकते. 1.2 किलोग्राम इतकं या लॅपटॉपचं वजन असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून याबबात अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही.  

Web Title: TECH: 'Geo' 4G cheap laptop soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.